IPL Kavya Maran: आयपीएलच्या बैठकीत वाद, संघ मालकांमध्ये पडले दोन गट; काव्या मारन कोणाच्या बाजूने?
BCCI Meet IPL Owners: शाहरुख खान आणि नेस वाडिया यांच्यात खटके उडाल्याची माहिती मिळत आहे.
BCCI Meet IPL Owners: आयपीएल (IPL) संघ मालकांसोबत बीसीसीय अधिकाऱ्यांची बैठक हा चर्चेचा विषय राहिला. 31 जुलै रोजी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यलयात ही बैठक झाली. या बैठकीत कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचे मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि पंजाब किंग्सचे (Punjab Kings) मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
बीसीसीआय आणि संघ मालकांमधील बैठकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयपीएल 2025 मेगा लिलाव आणि संघात किती खेळाडू ठेवता येईल, हा होता. या बैठकीत आयपीएलच्या लिलावावरुन संघ मालक यांची वेगवेगळी मते समोर आली. कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खान आणि सनरायझर्स हैदराबादची सह-मालक काव्या मारन यांनी थेट मेगा लिलावाला विरोध केला आहे. एकीकडे शाहरुख खान अधिक खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजूने असल्याचे दिसून आले. परंतु नेस वाडिया यांना संघांना अधिक खेळाडू ठेवण्याच्या बाजून नव्हते. याच मुद्द्यावरुन शाहरुख खान आणि नेस वाडिया यांच्यात खटके उडाल्याची माहिती मिळत आहे. केकेआर आणि हैदराबाद हे IPL 2024 चे अनुक्रमे विजेते आणि उपविजेते संघ होते, परंतु आतापर्यंत बीसीसीआयने या संघ मालकांच्या मतावर कोणताही औपचारिक निर्णय दिलेला नाही.
काव्या मारनने बैठकीत कोणते मुद्दे मांडले?
काव्या मारनने बैठीक काही महत्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये दर 5 वर्षांनी खेळाडूंचा लिलाव व्हायला हवा, हा मुख्य मुद्दा होता. तसेच संघातील 7 खेळाडूंना कायम ठेवता यावे, अशी मोठी मागणी देखील काव्य मारनने केली. काव्या मारनने विदेशी खेळाडूंच्या संख्येवरील निर्बंध हटवण्याची मागणी केली कारण बीसीसीआयने गेल्या वेळी कमीत-कमी 2 परदेशी खेळाडूंनाच संघात कायम ठेवण्याची परवानगी दिली होती.
Kavya Maran's recommendations at the IPL owners meeting (Espncricinfo):
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 1, 2024
- Minimum of 7 should be retained.
- No limit on overseas/Indian/uncapped retention out of those 7.
- Choice of discussing with players about retention/RTM at the auction.
- Mega auction every 5 years. pic.twitter.com/l7g1bihGyJ
बैठकीला कोण-कोण उपस्थित होतं?
मेगा लिलाव करायचा की नाही यावर एकमत होऊन किती खेळाडूंना कायम ठेवायचे हे ठरवले जाईल. बीसीसीआयने मेगा लिलाव न करण्याचा निर्णय घेतल्यास कदाचित कायम ठेवण्याची गरज भासणार नाही. या बैठकीत दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार आणि पार्थ जिंदाल, लखनऊ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, सनरायझर्स हैदराबादची काव्या मारन, चेन्नई सुपर किंग्जचे रूपा गुरुनाथ, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रथमेश मिश्रा आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले हे देखील उपस्थित होते. या व्यतिरिक्त, अनेक संघ मालक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते, सध्याच्या नियमानूसार आयपीएल 2025 मेगा लिलावात संघांना केवळ 3-4 खेळाडूंनाच ठेवण्याची परवानगी असेल.
संबंधित बातमी:
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!