Kiran Navgire: कष्टाचं फळ मिळालंच! सोलापूरच्या कन्येची भारतीय संघात निवड; इंग्लंड दौऱ्यात दाखवणार दम!
BCCI Announces Team India Women’s Squad For England Tour: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या (Indian women's cricket team) इंग्लंड दौऱ्यासाठी (England tour) एकदिवसीय आणि टी20 संघांची घोषणा करण्यात आली.
BCCI Announces Team India Women’s Squad For England Tour: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या (Indian women's cricket team) इंग्लंड दौऱ्यासाठी (England tour) एकदिवसीय आणि टी20 संघांची घोषणा करण्यात आली. कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरेची (K.P. Navgire) भारतीय संघात निवड झालीय.
किरण नवगिरेनं श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिक्षण घेतलं. दरम्यान, विविध क्रिडा स्पर्धेत सहभाग घेऊन यशाचा पाया रचण्यास सुरुवात केली. तिनं भालाफेक, बेसबॉल, सॉफ्टबॉल अथेलिटिक्स इत्यादी खेळात पदकं जिंकून महाविद्यालय व पुणे विद्यापिठाला अनेक पदकं आणि पुरस्कार मिळवून दिली. त्यानंतर पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघात तिची निवड झाली. तिनं नागालँड आणि अरुणाचल प्रदेश संघाचंही प्रतिनिधित्व केलं. आपल्या खेळात सातत्य ठेवत तिनं भारतीय महिला क्रिकेट संघाचं दार ठोठावलं. अखेर इंग्लंडविरुद्ध आगामी टी-20 मालिकेत तिची भारतीय महिला संघात निवड झाली. अनघा देशपांडेनंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण सोलापूरची दुसरी खेळाडू आहे. किरणची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीनं तिचं अभिनंदन करण्यात आलंय.
ट्वीट-
इंग्लंड दौऱ्यात भारताचा टी-20 संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, राधा यादव, शबिनेनी मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, किरण नवगिरे.
इंग्लंड दौऱ्यात भारताचा एकदिवसीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, शब्बिनेनी मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), यस्तिका भाटिया (विकेटकिपर), राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, हरलीन देओल.
हे देखील वाचा-