ZIM vs IND, 2nd ODI: भारताची भेदक गोलंदाजी, झिम्बाब्वेचा डाव 161 धावांवर आटोपला!
ZIM vs IND, 2nd ODI: भारत आणि झिम्बाब्वे (Zimbabwe vs India) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे खेळवला जात आहे.
ZIM vs IND, 2nd ODI: भारत आणि झिम्बाब्वे (Zimbabwe vs India) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. झिम्बाब्वेनं 31 धावांपर्यंत चार विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, शॉन विल्यम्सनं 42 धावांची खेळी करत संघाचा डाव काही काळ सांभाळला. पण संघ 38.1 षटकांत 161 धावांत गारद झाला.
या सामन्यात नाणेफक जिंकल्यानंतर भारतानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिब्बाब्वेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 161 धावांवर आटोपला. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सनं सर्वाधिक 42 धावा केल्या. तर, रायन बर्लेनं नाबाद 39 धावांचं योगदान दिलं. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद सिराज, दीपक हुडा, फेमस कृष्णा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जातोय. या सामन्यात विजय मिळवून भारताचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल. तर, या मालिकेतील आव्हान टिकण्यासाठी झिम्बाब्वेच्या संघाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
झिम्बाब्वेची प्लेईंग इलेव्हन:
इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, शॉन विल्यम्स, वेस्ली मॅदवेर, सिकंदर रझा, रेगीस चकाब्वा (कर्णधार/विकेटकिपर), रायन बुर्ल, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, व्हिक्टर एनवायुची, तनाका चिवांगा.
हे देखील वाचा-