IND W vs SA W ODI : भारतीय महिला संघाची चांगली सुरुवात, शेफाली वर्मासह स्मृती मानधनाचं अर्धशतक
प्रथम फलदांजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने सुरुवात चांगली केली आहे. शेफाली वर्माने विश्वचषकातील पहिले अर्धशतक ठोकले आहे.
ICC World Cup IND W vs SA W) ODI: महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात सामना होत आहे. क्राइस्टचर्च इथं खेळलल्या जात असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करणाऱ्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली. शेफाली वर्माने विश्वचषकातील पहिले अर्धशतक ठोकले. त्यानंतर ती 53 धावा करुन बाद झाली. त्यानंतर खेळायला आलेली यस्तिका भाटिया देखील दोन धावा करुन बाद झाली. दरम्यान, सध्या भारतीय महिला संघाच्या 25 षटकात 125 धावा झाल्या आहेत.
सध्या स्मृती मानधना 45 धावांवर खेळत आहे. तर कर्णधार मिथाली राज 18 धावांवर खेळत आहे. दरम्यान, या विश्वचषकातील आजचा सामना भारतीय महिला संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. आज भारतीय महिलांसमोर तगड्या दक्षिण आफ्रिकेला हरवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. भारताचे आत्तापर्यंत सहा सामने झाले असून, यापैकी तीन सामने भारतीय महिला संघाने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले आहेत. त्यामुळं आजचा विजय भारतीय महिला संघासाठी महत्वाचा आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड दोन्ही संघानी तीन तीन सामने जिंकले आहेत. पण नेटरनरेट भारताचा काहीसा कमी असल्याने भारत पाचव्या तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. उद्या इंग्लंडचाही सामना असून ते पराभूत झाल्यास आणि भारताने विजय मिळवल्यास भारत सहज सेमीफायनलमध्ये पोहोचेल. तर दोन्ही संघ जिंकल्यास भारताने इंग्लंडपेक्षा मोठ्या फरकाने सामना जिंकायला हवा. जेणेकरुन भारत सेमीफायलमध्ये पोहोचेल. भारत सध्या गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील सामना न्यूझीलंडच्या ख्रिस्टचर्च येथील हॅग्ले ओव्हल मैदानात खेळवला जात आहे. दरम्यान, भारतीय संघाने सुरुवात तर चांगली केली आहे. मात्र, आता यापुढे भारतीय महिला फलंदाज कशी कामगिरी करतात, ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. अद्याप निम्मा खेळ बाकी आहे. राहिलेल्या 25 षटकात भारतीय संघ किती धावा करणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : श्रेयस अय्यरची कमाल, दहा वर्षानंतर वानखेडेवर कोलकाता जिंकला
- IPL 2022, CSK vs KKR : श्रेयस अय्यरकडून आयपीएलचा शुभारंभ, बलाढ्य चेन्नईला मात देत 6 विकेट्सनी विजय