IND vs ZIM 2nd T20 : भारताच्या यंग ब्रिगेडनं पराभवाचा वचपा काढला, झिम्बॉब्वेवर दणदणीत विजयानं सव्याज परतफेड
Team India : भारतानं झिम्बॉब्वेला दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये पराभूत करत मालिकेत बरोबरी केली. अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडनं भारताचा डाव सावरला.
हरारे : भारत आणि झिम्बॉब्वे (IND vs ZIM) यांच्यातील दुसऱ्या टी 20 मॅचवर भारतानं सुरुवातीपासून वर्चस्व ठेवलं. अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 234 धावांचा डोंगर रचला. झिम्बॉब्वेचा संघ या धावसंख्येचा पाठलाग करु शकला नाही. भारतानं झिम्बॉब्वेला 100 धावांनी पराभूत केलं. भारतानं या विजयासह पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारतानं मुकेश कुमार, आवेश खान आणि रवि बिश्नोई यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झिम्बॉब्वेला 100 धावांनी पराभूत करत मालिकेत बरोबरी साधली.
झिम्बॉब्वेचा डाव गडगडला
भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काल भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या मॅचमध्ये झिम्बॉब्वेनं भारताला 13 धावांनी पराभूत केलं. आज शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी झिम्बॉब्वे पुढं विजयासाठी 235 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करण्यात झिम्बॉब्वेला अपयश आलं.वेस्ली मधेवेरे,ब्रायन बेनेट, ल्यूक जोंगवे या तिघांशिवाय इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. मधेवेरेनं 43 धावा केल्या. ब्रायनं बेनेटनं 26 धावा केल्या. ल्यूक जोंगवेनं 33 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजी करणाऱ्या आवेश खान यानं तीन तर मुकेश कुमार आणि रवि बिष्णोईनं झिम्बॉब्वेच्या दोन विकेट घेतल्या. तर, वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतली.
भारताकडून अभिषेक शर्माचं शतक
भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून शुभमन गिल फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. तो केवळ 2 धावा करुन बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडनं 137 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्मानं 47 धावांमध्ये 100 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड 77 तर रिंकू सिंगनं 48 धावा केल्या. या तिघाच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं 234 धावांचा डोंगर रचला. आज साई सुदर्शननं भारताकडून आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
भारताकडून मालिकेत बरोबरी
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. भारताला पहिल्या टी 20 मॅचमध्ये 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. फलंदाज आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आजच्या मॅचमध्ये कमबॅक केलं. भारतानं दुसऱ्या टी 20 सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी केली आहे.
आता भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील तिसरी टी 20 मॅच 10 जुलै रोजी होणार आहे. आता मालिकेत कोण आघाडी घेणार हे तिसऱ्या टी20 मॅचमध्ये ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
Abhishek Sharma : अभिषेक शर्माचं वादळी शतक, जे रोहित शर्मा-विराट कोहली जे जमलं नाही ते करुन दाखवलं