IND vs WI Live Score 1st Test Day 3 : पहिल्या कसोटीत भारताचा वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 140 धावांनी विजय! जडेजा, सिराज चमकले
India Vs West Indies Live Score, 1st Test Day 3 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.
LIVE

Background
India vs West Indies Live 1st Test Day 3 Latest Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दोन दिवसांचा खेळ संपल्यानंतर या सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व दिसत आहे. पहिल्या दिवशी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजांचे वर्चस्व होते. आता तिसऱ्या दिवशी टीम इंडिया आपला स्कोअर वाढवण्याचा आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.
टीम इंडियाचे वर्चस्व
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांना याचा फायदा उठवता आला नाही आणि त्यांचा पहिला डाव 162 धावांवर आटोपला. प्रत्युत्तर, भारतीय संघाने दुसरा दिवश अखेर 5 गडी गमावून 448 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजवर 286 धावांची आघाडी घेतली.
राहुल, जुरेल आणि जडेजा यांनी ठोकले शतक
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. राहुलचे हे शतक घरच्या मैदानावर जवळजवळ नऊ वर्षांनी आले. राहुलने त्याचे 11 वे कसोटी शतक झळकावले, तर जुरेलचे पहिले कसोटी शतक त्याच्या बॅटमधून आले. त्यानंतर जडेजाने त्याचे सहावे शतक झळकावले.
IND vs WI Live Score 1st Test Day 3 : पहिल्या कसोटीत भारताचा वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 140 धावांनी विजय! जडेजा, सिराज चमकले
रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार गोलंदाजी करत पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 140 धावांनी विजय मिळवून दिला. भारताने दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी आपला पहिला डाव 5 बाद 448 धावांवर घोषित केला आणि 286 धावांची आघाडी घेतली. वेस्ट इंडिजला दोन पूर्ण सत्रे फलंदाजी करता आली नाही आणि दुसऱ्या डावात ते 146 धावांवरच ऑलआऊट झाले.
IND vs WI Live Score 1st Test Day 3 : टीम इंडिया विजयापासून दोन विकेट्स दूर, वेस्ट इंडिजला धक्क्यावर धक्के; सिराज अन् जडेजाचा कहर
सिराजने शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला आठवी विकेट मिळवून दिली. त्याने एकाच षटकात दोन विकेट घेतल्या, ज्यामुळे वेस्ट इंडिजची धावसंख्या 8 बाद 98 अशी झाली. सिराजने प्रथम ग्रीव्हज आणि नंतर वॉरिकनला बाद केले. वेस्ट इंडिज भारतापेक्षा 188 धावांनी पिछाडीवर आहे आणि त्याच्यावर पराभवाचा धोका आहे.




















