एक्स्प्लोर

IND Vs WI, 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 44 धावांनी विजयी, मालिकेतही विजयी आघाडी

IND Vs WI, 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीया मालिकेत भारताने दुसरा सामनाही जिंकला आहे.

IND Vs WI, 2nd ODI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात (Narendra Modi Stadium) पार पडलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND Vs WI 2nd ODI) भारताने 44 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने दोन सामने जिंकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात भारतानं 50 षटकात 9 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजच्या संघासमोर 238 धावांचं लक्ष्य ठेवलं ज्यानंतर वेस्ट इंडिजला 193 धावांत सर्वबाद करत भारताने 44 धावांनी सामना जिंकला.

सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताकडून सलामीला मैदानात आलेला कर्णधार रोहित शर्मा (5 धावा, 8 बॉल) स्वस्तात माघारी परतला. शाई होपच्या गोलंदाजीवर त्यानं तिसऱ्या षटकातच आपली विकेट्स गमावली. त्यानंतर ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर रिषभ 18 धावांवर असताना बाद झाला. दरम्यान, विराटही मोठी धाव संख्या उभारण्यास अपयशी ठरला. त्यालाही केवळ 18 धावा करत्या आल्या. भारतानं तीन विकेट्स गमवल्यानंतर केएल राहुल आणि सुर्यकुमार यादवनं संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. केएल राहुलनं 49 तर, सुर्यकुमारनं 64 धावा केल्या. परंतु, अल्झारी जोसेफनं 29 व्या षटकात केएल राहुल आणि 39 व्या षटकात सुर्यकुमारला माघारी धाडलं. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (24 धावा 42 बॉल), शार्दुल ठाकूर (8 धावा, 15 बॉल), मोहम्मद सिराज (3 धावा 5 बॉल), युझवेंद्र चहलनं नाबाद 11 धावा केल्या. ज्यामुळं भारतीय संघाला 50 षटकात 9 विकेट्स गमावून 237 धावापर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडिजकडून ओडेन स्मिथ आणि अल्झारी जोसेफनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, केमार रोच, जेसन होल्डर, अकेल होसेन आणि फॅबियन ऍलन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

प्रसिधची चमकदार कामगिरी

ज्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ 238 धावा करण्यासाठी मैदानात आला. पण भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून कसून गोलंदाजी केली. ज्यामुळे वेस्ट इंडिजला लक्ष्यापर्य़ंत पोहोचता आले नाही. केवळ शामराह ब्रूक्स य़ाने 44 धावा केल्या तर अकेल होसेनने 34 धावांची झुंज दिली. पण इतर फलंदाज फेल ठरल्याने वेस्ट इंडिजचा संघ 46 ओव्हरमध्ये 193 धावा करुन सर्वबाद झाला आणि भारताने 44 धावांनी सामना जिंकला. यावेळी भारताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक चार, शार्दूलने दोन तर चहल, सुंदर, हुडा आणि सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
बुमराह-हार्दिकसह स्टार खेळाडू दुखापतीत, पण BCCIकडे 16 महिन्यांपासून डॉक्टर नाही! VVS लक्ष्मणने सांगितलं नेमकं काय घडलं?
बुमराह-हार्दिकसह स्टार खेळाडू दुखापतीत, पण BCCIकडे 16 महिन्यांपासून डॉक्टर नाही! VVS लक्ष्मणने सांगितलं नेमकं काय घडलं?
सामना संपला, अन् मैदानात राडा, 2 भारतीय खेळाडू भिडले, एक बॅट घेऊन मारण्यासाठी धावला, नेमकं काय घडलं? पाहा 'तो' 2 मिनटांचा VIDEO
सामना संपला, अन् मैदानात राडा, 2 भारतीय खेळाडू भिडले, एक बॅट घेऊन मारण्यासाठी धावला, नेमकं काय घडलं? पाहा 'तो' 2 मिनटांचा VIDEO
Rohit Sharma 2027 ODI World Cup : आज हो म्हणतात, उद्या नाही! BCCI ने रोहितसोबत खेळ थांबवावा; मुंबईच्या मोठ्या खेळाडूने वर्ल्डकपआधी निवड समितीला सुनावलं
आज हो म्हणतात, उद्या नाही! BCCI ने रोहितसोबत खेळ थांबवावा; मुंबईच्या मोठ्या खेळाडूने वर्ल्डकपआधी निवड समितीला सुनावलं

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget