IND vs NZ Women's T20I: भारतीय महिला संघानं टी-20 सामना गमावला, न्यूझीलंडचा 18 धावांची विजय
IND vs NZ Women's T20I: एकमेव टी-20 सामना खेळल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 12- 24 फेब्रुवारी दरम्यान 5 सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
IND vs NZ Women's T20I: न्यूझीलंडविरुद्ध क्वींसटाऊन (John Davies Oval, Queenstown) येथे खेळण्यात आलेल्या एकमेव टी-20 सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव (New Zealand beats India) झालाय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. ज्यामुळं भारतीय संघाला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली. न्यूझीलंडचे सलामीवीर सुझी बेट्स आणि कर्णधार सोफी डेव्हाईन यांनी पहिल्या विकेट्ससाठी 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर डेव्हाईन 31 धावा करून बाद झाली. बेट्सनं 36 धावा केल्या. तर, लिया ताहुहूनं 27 आणि मॅडी ग्रीननं 26 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, राजेश्वरी गाडकवाडला एक विकेट्स मिळाली.
शेफाली वर्माची निराशाजनक कामगिरी
न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकमेव टी-20 सामन्यात शेफाली वर्मानं निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून सलामी देण्यासाठी मैदानात उतरलेल्या यास्तिका भाटिया आणि शेफाली वर्मानं पहिल्या विकेट्ससाठी 41 धावांची भागीदारी केली. यास्तिकानं 26 धावा केल्या. तर, शेफाली फक्त 13 धावा करुन बाद झाली.
भारताची केवळ 137 धावांपर्यंत मजल
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामन्यात 155 धावांचा पाठलाग करताना केवळ 137 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून मेघानानं सर्वाधिक 37 धावा केल्या. तर, न्यूझीलंडच्या संघाकडून ऐमिली केर्र आणि जेन्सननं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
येत्या 12 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात
एकमेव टी-20 सामना खेळल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 12- 24 फेब्रुवारी दरम्यान 5 सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 2nd ODI: आज भारत, वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना, के एल राहुलचे संघात पुनरागमन
- IPL 2022 : कर्णधार हार्दिक पांड्याच्या संघाचं नाव ठरलं!
- IND vs WI, 2nd ODI : भारताला मालिका विजयाची संधी, तर वेस्ट इंडिज बरोबरीसाठी लढणार, कधी, कुठे पाहाल सामना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha