एक्स्प्लोर

IND Vs WI, 5th T20 Live : कोण जिंकणार मालिका? भारत आणि वेस्ट इंडिजमधील अखेरच्या टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट

IND Vs WI 5th T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज निर्णायक आणि अखेरचा टी20 सामना होणार आहे.

Key Events
IND Vs WI 5th T20 Live Updates India playing against West Indies match highlights Central Broward Stadium IND Vs WI, 5th T20 Live : कोण जिंकणार मालिका? भारत आणि वेस्ट इंडिजमधील अखेरच्या टी20 सामन्याचे लाईव्ह अपडेट
IND Vs WI Live Score

Background

IND Vs WI 5th T20 Live Updates : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज निर्णायक आणि अखेरचा टी20 सामना होणार आहे. पाच सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने 2-2 अशी बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सलग दोन सामन्यात भारताने विजय मिळवत भारताने बरोबरी केली होती. आज दोन्ही संघामध्ये निर्णायक टी 20 सामना होणार आहे. विजेता संघ मालिका खिशात घालणार आहे. अनुभवी वेस्ट इंडिज आणि युवा भारतीय संघ जेतेपदासाठी मैदानावर उतरणार आहे. 

भारतीय संघाने लागोपाठ दोन सामने जिंकून जबरदस्त कमबॅक केले. शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांनी जबरदस्त सलामी दिली होती. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माही फॉर्मात आहेत. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांच्या फॉर्माची चिंता कायम आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय फलंदाज प्रभावी कामगिरी करतील. भारताची गोलंदाजीही प्रभावी आहे. चहल आणि कुलदीप यांच्या फिरकी माऱ्याला अर्शदीप आणि मुकेश कुमार यांच्या भेदक माऱ्याची जोड आहे. दुसरीकडे अनुभवी वेस्ट इंडिजही विजयासाठी उतरणार आहे. निकोलस पूरन, शाय होप, काइल मायर्स, शिमरोन हेटमायर आणि रोवमन पॉवेल भन्नाट फॉर्मात आहेत. त्याशिवाय गोलंदाजीतही विंडिजचे खेळाडू अनुभवी आहेत. तळापर्यंत दर्जेदार फलंदाज ही विंडिजची जमेची बाजू आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज कोणता संघ बाजी मारणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघात आजच्या सामन्यात बदलाची शक्यता कमीच आहे. हार्दिक पांड्या आणि पॉवेल आपला संघ कायम ठेवण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल. फ्लोरिडाची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. त्यामुळे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कॅरेबिअन फलंदाजांना रोखण्याचे युवा भारतीय संघापुढे आव्हान असेल. 

हेड टू हेड - 

कोण वरचढ ?

भारताच्या युवा टीमपुढे तगड्या वेस्ट इंडिजचे आव्हान आहे. कागदावर विडिंजचा संघ वरचढ दिसतोय. पहिल्या तिन्ही सामन्याची खेळपट्टी संथ होती, पण अखेरचा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होत आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, त्यामुळे आजचा सामना हायस्कोरिंग असेल. आजच्या सामन्यात विडिंजचे पारडे जड दिसतेय. पण युवा भारतीय संघ पटलावर करु शकतो. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11

यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेईंग 11

ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिम्रोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, ओबेद मैककॉय

00:13 AM (IST)  •  14 Aug 2023

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का बसलाय. तिलक वर्माने घेतली विकेट

00:07 AM (IST)  •  14 Aug 2023

पावसाच्या व्यत्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात

पावसाच्या व्यत्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिज एक बाद 117 धावा... 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget