IND vs WI, 3rd ODI Live : जबरदस्त! भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, मालिकेतही क्लिन स्वीप
IND vs WI, 3rd ODI : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकून भारत वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न करेल.
LIVE
Background
Ind vs WI, 3rd ODI Live Blog : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. पहिला आणि दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश देऊन मालिका 3-0 च्या फरकाने खिशात घालेल. दुसरीकडे वेस्ट इंडीजचा संघ आजचा सामना जिंकून किमान मालिकेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे. सामना त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथील क्विवन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये (Queen Park Oval Stadium) खेळवला जाणार आहे.
आजचा सामना होणाऱ्या मैदानातच पहिले दोन्ही सामने खेळवण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघानी 300 पार धावसंख्या नेली. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज केवळ 3 धावांनी पराभूत झाला. तर दुसऱ्या सामन्यातही भारत अखेरच्या षटकाच 312 धावांचे आव्हान केवळ दोन गडी राखून पूर्ण करु शकला. त्यामुळे दोन्ही चुरशीचे सामने पाहायाला मिळाले आहेत. याशिवाय मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलकडे असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणे एक मोठी धावसंख्या होऊ शकते.
संभाव्य भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
संभाव्य वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
हे देखील वाचा-
- ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार
- IND vs WI, 2nd ODI Result : अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी