Women Cricket Team Captain : मितालीच्या निवृत्तीनंतर हरमनप्रीतकडे कर्णधारपद; श्रीलंकेविरुद्ध सामन्यांसाठी संघ जाहीर
भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एकदिवसीय संघाची नवी कर्णधार हरमनप्रीत असणार आहे.
Team India : भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Mithali raj Retirement) घेतल्यानंतर काही तासांतच आगामी भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांसाठी बीसीसीआयने एकदिवसीय आणि टी20 महिला संघाची घोषणा केली आहे. मितालीनंतर आता एकदिवसीय संघाचं कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे (harmanpreet kaur) सोपवण्यात आलं असून स्मृती मंधाना उप कर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीला विश्रांती यावेळी देण्यात आली आहे.
भारतीय महिला संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून 23 जूनपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. यावेळी 23, 25 आणि 27 जून रोजी तीन टी20 सामने खेळवले जाणार आहेत. तर 27 जून, 1 आणि 7 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी संपूर्ण संघ जाहीर करण्यात आले असून नेमकी कोणा-कोणाला संधी मिळाली आहे पाहूया...
एकदिवसीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटीया (यष्टीरक्षक), एस. मेघना, दिप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादुर, रिचा घोष (यष्टीरक्षक), पुजा वस्त्रकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), हरलीन देवोल.
टी 20 संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटीया (यष्टीरक्षक), एस. मेघना, दिप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादुर, रिचा घोष (यष्टीरक्षक), पुजा वस्त्रकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमा रॉड्रीग्स, राधा यादव
हे देखील वाचा-
- तब्बल 23 वर्षे आंतरराष्ट्रीय मैदान गाजवून मितालीचा क्रिकेटला अलविदा; तिचे काही रेकॉर्ड तोडणं म्हणजे अगदी अशक्य
- Rahul Dravid on Hardik : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाचा फॅन झाला कोच राहुल द्रविड, म्हणाला...
- Mithali Raj Retirement : टीम इंडियाची विक्रमवीर मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती