Rahul Dravid on Hardik : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाचा फॅन झाला कोच राहुल द्रविड, म्हणाला...
Hardik Pandya : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांसाठी भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. त्याच्या पुनरागमनाची चर्चा सध्या सुरु आहे.
Hardik Pandya : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या नेतृत्त्वाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. हार्दिक पांड्याचा संघ गुजरात टायटन्स आयपीएलचा चषक जिंकला असून त्यानंतर लगेचच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) सामन्यांसाठी हार्दिकची टीम इंडियामध्ये (Team India) एन्ट्री झाली आहे. दरम्यान त्याच्या आयपीएलमधील कामगिरीचं टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडनेही कौतुक केलं आहे.
'हार्दिक पांड्याची पुन्हा गोलंदाजी करणं संघासाठी फायद्याचं'
राहुल द्रविड हार्दिक पांड्याबद्दल बोलताना म्हणाला, 'हार्दिकने पुन्हा गोलंदाजी करणं सुरु करणं संघासाठी चांगले संकेत आहेत. आम्हाला माहित आहे तो टीम इंडियासाठी चांगलं योगदान देऊ शकतो. त्याने गोलंदाजी केल्यास भारतीय संघाला अधिक फायदा होतो. मी काही वेळापूर्वीच त्याला भेटलो असून आयपीएलचा अंतिम सामना खेळलेल्या खेळाडूंचा सराव काहीसा उशिरा सुरु झाला. त्यात हार्दिकने आयपीएलमध्ये अगदी चांगली खेळी आणि कर्णधारपदही निभावलं.'
हार्दिकची आयपीएल 2022 मधील कामगिरी
यंदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम खेळत खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघाला आयपीएल 2022 चं जेतेपद हार्दिकने मिळवून दिलं. शिवाय गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 15 सामन्यात 487 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 44.27 असून स्ट्राइक रेट 131.26 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करताना दिसून आला.
हे देखील वाचा-
- NZ vs ENG : मैदानात दिसली जो रुटची 'जादूगिरी', हात न लावता उभी केली बॅट, पाहा Video
- माझा आदर्श वकार युनूस नाही, तर बुमराह शमी आणि भुवनेश्वर' : उमरान मलिक
- Shocking: 'सचिनला आऊट नाही तर, जखमी करायचं होतं' शोएब अख्तरच्या वक्तव्यानं क्रिडाविश्वात खळबळ
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.