IND Vs SA T20 Series : गौतम गंभीरला डच्चू; नवा कोच, नवा कर्णधार...; दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाहा संपूर्ण वेळापत्रक!
India Vs South Africa T20 Series Schedule : न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीपसह पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता पुढील मिशनसाठी सज्ज झाला आहे.
India Vs South Africa T20 Series Schedule : न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीपसह पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता पुढील मिशनसाठी सज्ज झाला आहे. आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे, जिथे 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
सूर्याला टी-20 फॉरमॅटचा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात आले आहे. दुसरीकडे गौतम गंभीरच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण या टी-20 मालिकेत प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याचे कारण म्हणजे गंभीर न्यूझीलंड कसोटी मालिकेत व्यस्त होता. आता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ 8 नोव्हेंबरला डर्बनमध्ये पहिला टी-20 सामना खेळणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी संघ गाकेबरहा येथे जातील. त्यानंतर उर्वरित दोन सामने सेंच्युरियन (13 नोव्हेंबर) आणि जोहान्सबर्ग (15 नोव्हेंबर) येथे खेळवले जातील.
या टी-20 मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज रमणदीप सिंग आणि वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाक यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रथमच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळाले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, वेगवान गोलंदाज मयांक यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे दुखापतीमुळे संघात नाहीत. अष्टपैलू रियान परागही निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
Touchdown Durban 🛬🇿🇦
— BCCI (@BCCI) November 4, 2024
How good is #TeamIndia's knowledge of their next destination 🤔#SAvIND pic.twitter.com/m4YjikAw6Y
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघ :
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैभव, आवेश खान आणि यश दयाल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोन्गवाना, न्काबा पीटर, रायन सिमेला रिकेलने, लुईओ रिकेल, नियान सिपमला आणि ट्रिस्टन स्टब्स.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
8 नोव्हेंबर – पहिली टी-20, डर्बन
10 नोव्हेंबर- दुसरा टी-20, गेकेबरहा
13 नोव्हेंबर- तिसरा टी-20, सेंच्युरियन
15 नोव्हेंबर- चौथा टी-20, जोहान्सबर्ग
हे ही वाचा -
Team India: रोहित शर्माचा पत्ता कट होणार; कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दोन नावाची चर्चा