Ind vs SA T20 Series: भारत विरुद्ध द. अफ्रिकेत 5 टी-20 सामन्यांचा थरार; सामना कुठे अन् कधी रंगणार?, संपूर्ण वेळापत्रक
Ind vs SA T20 Series: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 9 डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना रंगणार आहे.

Ind vs SA T20 Series: भारत आणि दक्षिण अफ्रिका (Ind vs SA ) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 9 डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना रंगणार आहे. कटकमधील बाराबती मैदानावर खेळवण्यात येईल. सायंकाळी 6.30 वाजता नाणेफेक होईल आणि 7 वाजता सामना खेळण्यास सुरुवात होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर टीव्हीवर (Ind vs SA T20 Series Broadcast) पाहू शकता. मोबाईलवर सामने पाहणारे प्रेक्षक जिओहॉटस्टारवर टी-20 मालिकेतील सर्व सामने थेट पाहू शकतात.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: (Ind vs SA 1st T20 Playing XI)
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा/अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ- (Ind vs SA T20 Team India Squad)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा.
भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका 9 डिसेंबर रोजी कटक येथे सुरू होईल. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी चंदीगड, 14 डिसेंबर रोजी धर्मशाळा, 17 डिसेंबर रोजी लखनौ आणि 19 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे सामने खेळवले जातील. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ सध्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा टी-20 संघ आहे, तर दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 च्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जाते.
🚨 PREDICTION TIME FOR INDIA vs SOUTH AFRICA T20I SERIES 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) December 8, 2025
Result -
Most runs -
Most wickets -
Player of the series - pic.twitter.com/V4Jh07V2hd





















