IND vs SA: आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सूर्याची चमकदार खेळी; शिखर धवनला टाकलं मागं
Suryakumar Yadav breaks Shikhar Dhawan's record: भेदक गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सनं पराभव केला.
Suryakumar Yadav breaks Shikhar Dhawan's record: भेदक गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय. या सामन्यात अर्शदीप सिंह (Arshdeep Singh), दीपक चाहरनं (Deepak Chahar) भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 106 धावांवर रोखलं. त्यानंतर केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकांच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 107 धावांचं लक्ष्य 16.4 षटकांतच पूर्ण केलं. भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सूर्याकुमार यादवनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरलाय. या कामगिरीसह त्यानं भारताचा सलामीवीर शिखर धवनलाही (Shikhar Dhawan) मागं टाकलंय.
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. मात्र, त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सूर्यकुमारनं कोणताही दबाव न घेता आक्रमक फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. यासोबतच सूर्यकुमार यादवनं भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवनलाही मागं टाकलंय.
शिखर धवनला मागं टाकलं
धवननं 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 689 धावा केल्या होत्या. तर, सूर्यकुमारनं यावर्षी 700 हून अधिक धावांचा टप्पा गाठलाय. विराट कोहली एका कॅलेंडर वर्षात चार वेळा भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय.
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनं विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात नाणेपेक जिंकून रोहित शर्मानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 106 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, दीपक चाहर आणि हर्षल पटेलच्या खात्यात प्रत्येकी दोन- दोन विकेट्स जमा झाल्या. तर, अक्षर पटेलला एक विकेट्स मिळाली.प्रत्युत्तरात भारतानं 8 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताकडून सूर्याकुमार यादव आणि केएल राहुलनं अर्धशतकी खेळी केली.
हे देखील वाचा-