IND vs SA 1st T20 : टी 20 साठी 'असा' असणार दक्षिण आफ्रिकेचा संघ, डी कॉकसोबत सलामीला खेळणार 'हा' खेळाडू
IND vs SA 1st T20 : पहिल्या टी20 सामन्यात विकेटकिपर आणि सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकसोबत रीजा हेंड्रिक्स डावाची सुरूवात करण्याची शक्यता आहे. हेंड्रिक्सला टी20 मधील खास खेळाडू म्हणून ओळखले जाते.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला असून सध्या दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानावर दोन्ही संघ सराव करत आहेत. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 9 जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात डी कॉकसोबत डावाची सुरूवात कोण करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टी20 सामन्यात विकेटकिपर आणि सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकसोबत रीजा हेंड्रिक्स डावाची सुरूवात करण्याची शक्यता आहे. हेंड्रिक्सला टी20 मधील खास खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यानंतर तीन नंबरवर कर्णधार टेंबा बावुमा खेळेल.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात चार नंबरला एडन मार्कराम खेळेल. तर पाचव्या क्रमांकावर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला डेव्हिड मिलर खेळेल. मार्कराम आणि मिलर या दोघांनी आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सच्या विजयात मिलरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यानंतर स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन सहाव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिका बजावू शकतो.
गोलंदाजीत फिरकीपटू तबरीझ शम्सी आणि तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये कागिसो रबाडा, एनरिक नोर्टजे आणि मार्को जॅन्सेन हे भारतीय फलंदांजांना रोखण्याचे काम करतील.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेंबा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन, तबरीझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि मार्को जॅन्सेन.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.
महत्वाच्या बातम्या
Dinesh Karthik : दिनेश कार्तिक अंतिम 11 मध्ये? कोच राहुल द्रविडचं सूचक वक्तव्य
ICC Mens Test Rankings 2022 : फलंदाजीत विराट दहाव्या क्रमांकावर, गोलंदाजीत अश्विन दुसऱ्या तर अष्टपैलूमध्ये जाडेजा पहिल्या क्रमांकावर