Dinesh Karthik : दिनेश कार्तिक अंतिम 11 मध्ये? कोच राहुल द्रविडचं सूचक वक्तव्य
IND vs SA : आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 सामन्यांना 9 जूनपासून दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात सुरुवात होणार आहे.
India vs South Africa, T20 : भारतीय क्रिकेट टीम 9 जूनपासून पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी संघाची घोषणा केली. यावेळी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असून बऱ्याच खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे त्यांची संघात निवड झाली आहे. त्यामुळे भारताचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकही संघात परतला आहे. त्याने यंदा आरसीबीकडून दमदार फलंदाजी केल्याने त्यांची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. दरम्यान आता त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष असून याबाबत संघाचा कोच राहुल द्रविडने एक सूचक वक्तव्य केलं आहे.
दिनेश कार्तिकच्या संघातील रोलबाबत बोलताना कोच राहुल द्रविड म्हणाला,''दिनेश कार्तिकचा रोल स्पष्ट आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये त्याच्या संघाकडून एक उत्तम फिनीशर म्हणून कामगिरी केली. त्यामुळेच त्याची टीम इंडियात पुन्हा एन्ट्री झाली आहे.'' दरम्यान द्रविडच्या या वक्तव्यामुळे कार्तिक एक फिनीशर म्हणून संघात असण्याची दाट शक्यता आता वर्तविली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 9 जून | अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.