IND VS SA 2nd Test Day 3 : फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला 290 धावांची गरज; टीम इंडिया तिसऱ्या दिवशी आफ्रिकेला रडवणार? जाणून घ्या अपडेट्स
IND VS SA Marathi News : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे.

India vs South Africa 2nd Test Day 3 Update : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सेनुरन मुथुस्वामीच्या शतक आणि मार्को जानसेनच्या 93 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर 489 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस भारताने एकही विकेट न गमावता 9 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल 7 आणि केएल राहुल 2 धावांवर नाबाद आहेत. तिसऱ्या दिवशी भारत दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येच्या जवळ जाण्यासाठी उत्सुक असेल.
That's stumps on Day 2!
— BCCI (@BCCI) November 23, 2025
Another enthralling day's play comes to an end 🙌#TeamIndia openers will resume proceedings tomorrow ⏳
Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnqQn8#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QDuEZyCqsF
फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला 290 धावांची गरज
या सामन्यात फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला 290 धावांची आवश्यकता आहे आणि भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. पहिल्या डावात, भारतीय फलंदाजांना प्रथम 489 धावा कराव्या लागतील आणि नंतर मोठी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल, जे सोपे वाटत नाही. पण, भारतीय फलंदाजांकडे क्षमता आहे आणि प्रत्येकाला चांगले डाव खेळावे लागतील. भारत दुसरी कसोटी जिंकल्यासच कसोटी मालिका बरोबरीत आणू शकतो, परंतु पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या उच्चांकी धावसंख्येमुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. येथून, भारताचा विजयाचा मार्ग सोपा वाटत नाही. जर भारताने ही कसोटी अनिर्णित केली तर ती मोठी कामगिरी ठरेल.
मुथुस्वामीने ठोकले शतक
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 489 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. दक्षिण आफ्रिकेकडून मुथुस्वामीने शतक झळकावले, तर मार्को जॅन्सन 93 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने सहा बाद 247 धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला. मुथुस्वामीने प्रथम व्हेरेनसह सातव्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली आणि नंतर जॅन्सनसह आठव्या विकेटसाठी 97 धावा केल्या.
मुथुस्वामीच्या पहिल्या कसोटी शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली. भारताची गोलंदाजी इतकी खराब होती की संघाला चार विकेट घेण्यासाठी तीन सत्र लागले. पण, कुलदीपने जॅन्सनला बाद करून दक्षिण आफ्रिकेला ऑलआऊट केले. दक्षिण आफ्रिकेकडून मुथुस्वामीने सर्वाधिक 109 धावा केल्या, तर काइल वेरेन 45 धावांवर बाद झाला. भारताकडून कुलदीप यादवने चार बळी घेतले, तर बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
हे ही वाचा -



















