IND VS SA 2nd ODI LIVE Score : श्रेयस-ईशानची दमदार खेळी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनी विजय
India vs South Africa 2nd ODI LIVE Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे.
LIVE
Background
IND vs SA, 2nd ODI Live Score : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे खेळवल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात विजय मिळवणं दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण दक्षिण आफ्रिकेने आज विजय मिळवला तर पहिल्या सामन्यातील विजयामुळे ते मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतील. तर भारताचं स्पर्धेतील आव्हान जिवंत राहण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे.
पिच रिपोर्ट अर्थात रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीचा विचार करता हे मैदान कमी धावसंख्येचे मैदान असल्याने या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता कमी आहे. रांची स्टेडियमची विकेट स्लो असल्याने जास्त मोठा स्कोर उभा राहणार नाही असा अंदाज आहे. विकेटचा विचार करता या खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक फायदा होऊ शकल्याने दोन्ही संघ स्पीनर खेळवू शकतात...खेळ पुढे-पुढे जाईल तशी फलंदाजी करणं सोपं होऊ शकतं.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa ODI Record) यांच्यात आतापंर्यंत 88 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 50 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 35 सामने जिंकता आले आहेत. यातील तीन सामने अनिर्णित देखील सुटले आहेत.
कशी असू शकते भारतीय संघाची अंतिम 11?
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारत 9 धावांनी पराभूत झाला असल्याने दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. त्यात दीपक चाहर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून वॉशिंग्टन सुंदर संघात आलेला आहे. आता सुंदरला संधी दिली जाऊ शकते. तसंच शाहबाज, राहुल यांच्यातील कोणालाही संधी मिळू शकते. तर पाहूया कशी असू शकते संभाव्य अंतिम 11
संभाव्य टीम इंडिया
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर.
हे देखील वाचा-