IND vs SA, 1st Innings Highlights : हेनरिक-डेविड मिलरनं सावरला दक्षिण आफ्रिकेचा डाव, 250 धावाचं भारतासमोर आव्हान
IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 40 ओव्हर्सचा करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतासमोर 40 षटकांत 250 धावां करण्याचं आव्हान आहे.
IND vs SA, 1st ODI, Ekana Sports City : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 249 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. ज्यामुळे आता भारताला विजयासाठी 250 धावा करायच्या आहेत. त्यात सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 40 ओव्हर्सचा करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारताला 250 धावा 40 षटकात करायच्या आहेत.
सामन्यात सर्वात आधी म्हणजे नाणेफेक पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने झाली. ज्यामुळे 1.30 वाजता सुरु होणारा सामना जवळपास 2 ते 2.30 तास उशिराने सुरु झाला. त्यानंतर नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी निवडली. सुरुवातीला भारताची गोलंदाजीही चांगली झाली. शार्दूलने दमदार अशा विकेट्स सुरुवातीला घेतल्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉकने 48 धावांची चांगली खेळी केली. तो बाद झाल्यावर पुन्हा संघ अडचणीत येईल असे वाटत होते. पण हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या दोघांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी अनुक्रमे नाबाद 74 आणि नाबाद 75 धावा करत 249 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताला विजयासाठी 250 धावा 40 षटकात करायच्या आहेत. भारताकडून शार्दूल ठाकूरने 2 तर रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Formidable fifties from David Miller and Heinrich Klaasen 🤜🤛#INDvSA | Scorecard: https://t.co/MpAhJYqiUB pic.twitter.com/fPyw5mTgay
— ICC (@ICC) October 6, 2022
कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?
आज कर्णधार शिखर आणि उपकर्णधार श्रेयससह गिल आणि ऋतुराज यांना वरच्या फळीत घेतलं आहे. ईशान आणि संजू असे दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजही संघात आहेत. तर शार्दूलवर अष्टपैलू कामगिरी निभावण्याची जबाबदारी आहे. फिरकीपटू कुलदीपसह रवी बिश्नोई संघात आहे. तर मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांना वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दिली गेली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा हाच असून डी कॉककडे महत्त्वाची जबाबदारी आहे. जनेमन मालन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलरवर फलंदाजीची जबाबदारी असून वेन पारनेल, केशव महाराज अष्टपैलू कामगिरी करतील यासाठी त्यांना संघात घेतलं आहे. तर कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी यांना संघात घेतलं आहे.
असा आहे भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, आवेश खान
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ
जनेमन मालन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी
हे देखील वाचा-