IND vs PAK: भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज लढतीत कोण जिंकणार? हरभजन-इरफान पठाण, वसीम आक्रम ते गावसकर, दिग्गजांनी सांगितलं कोण जिंकणार?
IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीबाबत दिग्गजांनी आपला आपला अंदाज वर्तवला आहे.
न्यूयॉर्क: टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज लढत न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या मॅचकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आजच्या मॅचमध्ये कोण जिंकणार याबाबत भारत आणि पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी अंदाज वर्तवला आहे. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम आक्रमनं आजच्या मॅचचा विजयाचा दावेदार भारतीय संघ असल्याचं म्हटलं आहे.
हरभजन सिंग: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं स्टार स्पोर्टर्स सोबत बोलताना आजची मॅछ भारतीय संघ जिंकणार असल्याचं म्हटलं. भारताची बॅटिंग पाकिस्तानपेक्षा चांगली आहे. त्याशिवाय बॉलिंग देखील चांगली आहे. भारताकडे जसप्रीत बुमरहा, हार्दिक पांड्या आहे. सिराज आणि अर्शदीप सिंग चांगली गोलंदाजी करत आहेत, असं हरभजन सिंगनं म्हटलं.
वसीम आक्रम : वसीम आक्रमनं भारतीय संघ चांगली कामगिरी करतेय त्यामुळं ते आजच्या मॅचमधील विजयाचे दावेदार आहेत, असं म्हटलं. भारतीय संघ विजयाचा 60 तर पाकिस्तान 40 टक्के दावेदार आहे, असं आक्रम म्हणाला.
नवजोत सिंह सिद्धू: भारताचा माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धूनं भारतीय संघ संतुलित असल्याचं म्हटलं. भारताकडे तीन ऑलरांडर, गोलंदाजीचे 6-7 पर्याय आहेत. फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. रोहित शर्मा देखील फॉर्ममध्ये असल्यानं भारतीय संघ वरचढ असल्याचं सिद्धूनं म्हटलं.
वकार यूनुस: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून वकार यूनुसनं पाकिस्तानचा संघ विजयाचा दावेदार असल्याचं म्हटलं.
सुनील गावसकर: भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला विजयाचा दावेदार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय भारताकडे चार वेगवान गोलंदाज आहेत. रोहित शर्मा आणि रिषभ पंत चांगली फलंदाजी करत आहेत, असं गावसकर म्हणाले.
स्टीव स्मिथ: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडून स्टीव्ह स्मिथनं भारतीय संघ जिंकेल असं म्हटलं. दोन्ही संघाकडे वेगवान गोलंदाजांची चांगली टीम असल्याचं स्मिथ म्हणाला.
इरफान पठाण:इरफान पठाण यानं भारतीय संघ जिंकेल असं म्हटलं. भारतीय संघ मजबूत असून पॉवर प्लेमध्ये भारत कशी बॅटिंग करतो हे महत्त्वाचं असेल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रिषभ पंत पॉवर प्लेमध्ये चांगला प्रतिकार करतील आणि मॅच आपल्या हातात येईल, असं इरफान पठाण म्हणाला.
रमीझ राजा: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजानं सध्या भारताची बाजू वरचढ असल्याचं म्हटलं. भारतीय संघानं सर्व बॉक्स टीक केले असल्याचं राजा म्हणाले.
श्रीशांत: भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतनं टीम इंडिया जिंकणार असल्याचं म्हटलं. दरवेळी विराट कोहलीची कामगिरी एक्स फॅक्टर असतो पण यावेळी हार्दिक पांड्या असेल, असं श्रीशांत म्हणाला.
अंबाती रायडू: भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूनं टॉस महत्त्वाचा असेल पण भारतीय संघ जिंकेल, असं म्हटलं.
पियूष चालवा: पियूष चावलानं आजच्या मॅचमध्ये भारतीय संघ जिकेल, असं सांगितलं.
संबंधित बातम्या :