T20 World Cup 2024 IND vs PAK: भारत अन् पाकिस्तानच्या सामन्यात पाऊस खेळ बिघडवणार...; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
T20 World Cup 2024 IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.
T20 World Cup 2024 IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना आज सायंकाळी न्यूयॉर्कमध्ये खेळवला जाईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सामनादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही चाहत्यांच्या दाव्यानुसार नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील सेक्शन 252 च्या 20 व्या रांगेतील 30 क्रमांकाच्या सीटच्या तिकीटाची रिसेल बाजारात किंमत 175,400 अमेरिकन डॉलर म्हणजेच 1.5 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. मात्र हवामान खात्याच्या मते, आज सायंकाळी न्यूयॉर्कमध्ये हलका पाऊस पडू शकतो. त्यामुळे पाऊस पडला तर चाहत्यांची नक्कीच निराशा होईल.
New York weather - light rain 🌧️ from 10:00 continuing beyond 12:45 - with 30% to 50% chance of rain ☔️ #Cricket #PakvsInd pic.twitter.com/GExjxsfUyE
— Political Majesty (@GlobalAnalyzer) June 9, 2024
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. पाऊस पडल्यास खेळाला विलंब होऊ शकतो. नाणेफेकीपूर्वी पाऊस पडल्यास सामन्याची वेळ वाढू शकते.गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर बाबर आझमच्या संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, आता ते पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाबर तसेच मोहम्मद रिझवानकडून पाकिस्तानला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तर भारताकडून विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.
भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक हेड टू हेड
टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 7 सामने झाले आहेत. या 7 सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर वर्चस्व राखले आहे. भारताने 5 सामने जिंकले असून पाकिस्तानने फक्त एकच सामना जिंकला आहे. एकदा सामना टाय झाला आणि एका सामन्यात निकाल लागला नाही.