IND vs PAK Live Streaming: 2 सप्टेंबरला टीम इंडिया अन् पाकिस्तान यांच्यात महामुकाबला; कधी, कुठे पाहणार?
IND vs PAK: यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती.
IND vs PAK Live: आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात 2 सप्टेंबरला महामुकाबला रंगणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा आशिया चषक (Asia Cup 2023) सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे होणार आहे. आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे.
यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामना कधी, केव्हा, कुठे आणि कसा पाहता येईल, हे जाणून घेऊयात सविस्तर...
कधी होणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?
आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज सामना 2 सप्टेंबर रोजी शनिवारी खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे. तर दुपारी 2.30 वाजता टॉस होणार आहे.
कुठे रंगणार सामना?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील पल्लेकलेच्या पल्लेकल इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
भारतात कधी पाहता येणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.
लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.
आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.