एक्स्प्लोर

Ind Vs Pak Asia Cup: आम्हाला वाटतंच होतं, पाकिस्तान काहीतरी करेल, सूर्यकुमार यादवने सांगितली टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील इनसाईड चर्चा

Ind Vs Pak Asia Cup: भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यानंतर दुबईत नेमके काय घडले, याबद्दल सविस्तर तपशील सांगितला. आम्ही दीड तास ट्रॉफी घेण्यासाठी मैदानात उभे होतो.

Ind Vs Pak Asia Cup Suryakumar Yadav: आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे सोमवारी रात्री त्याच्या देवनार येथील निवासस्थानी आगमन झाले. यावेळी येथील नागरिकांनी सूर्याचे जल्लोषात स्वागत केले. त्याच इमारतीत राहणारे शिवसेनेचे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेसह सूर्यकुमार यादव याचे शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन केले. यावेळी सूर्यकुमाराचे औक्षणही करण्यात आले. त्यानंतर सूर्यकुमार याने शेवाळे यांच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटोसेशन देखील केले. यानंतर सूर्यकुमार यादव याने 'एबीपी माझा'शी संवाद साधताना आशिया कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. (Ind Vs Pak Final Match)

आशिया चषक जिंकल्यानंतर मला खूप चांगलं वाटत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियातील सर्व खेळाडूंना घरी जाण्याचे वेध लागले होते. माझे विमान दोन दिवसांनी होते. मात्र, मी आजच घरी आलो. आशिया चषक स्पर्धेचा दौरा मोठा असल्याने जवळपास 25 दिवस आम्ही घरापासून लांब आहोत. पहिल्या 12-13 दिवसांत आ्ही फक्त तीन सामने खेळलो, त्यानंतर पटापट आमचे सामने होते. आता घरी आल्यानंतर येथील नागरिकांना माझे स्वागत केले, याचा आनंद वाटला. मी विमानात असताना मला बायको सारखं फोन करुन विचारत होती, कुठे आलात, तुम्ही किती वेळात पोहोचणार? आता माझे ज्याप्रकारे स्वागत झाले आहे, हे निश्चित मनाला सुखावणारे आहे, असे सूर्यकुमार यादव याने सांगितले. 

Ind Vs Pak Final Match: आम्हाला वाटतंच होतं, पाकिस्तान काहीतरी करेल: सूर्यकुमार यादव

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी असणाऱ्या दबावाबाबत सूर्यकुमार यादवने भाष्य केले. तो म्हणाला की, भारत-पाक सामन्यावेळ मैदानात थोडंफार प्रेशर नक्कीच असते. पण मी च्युईंगम आणि स्माईलच्या आड हे प्रेशर लपवतो. अनेकदा मी इतर सहकाऱ्यांशी बोलत राहतो, असे सूर्याने सांगितले. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना वैफल्य आले होते. याच वैफल्यामुळे ते मैदानात आणि पत्रकार परिषदांमध्ये वेगळंच काहीतरी बोलत होते. या सगळ्या गोष्टींमुळे कितीही नाही म्हटले तर लक्ष विचलित होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवले की, आपण सर्व फोकस फक्त क्रिकेटवर ठेवू. त्यांना जे करायचंय ते करु दे. आशिया कप स्पर्धेतील सामना जिंकल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं, तिकडून काहीतरी येणार, आम्ही सुपर-4 मध्ये खेळणार  तेव्हा किंवा फायनलमध्ये येणार तेव्हा. पण आम्ही चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळायचे ही एकच गोष्ट डोक्यात ठेवली होती, असे  सूर्यकुमार यादव याने सांगितले.

आणखी वाचा

मॅच संपल्यावर आम्ही दीड तास ताटकळत, ट्रॉफी घ्यायला जाणार इतक्यात ते लोक.... सूर्यकुमार यादवने सांगितलं दुबईच्या मैदानात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Buldhana : पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची उधळपट्टी
पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
Embed widget