IND vs PAK Rain: 4 षटकानंतरच सामन्यात पावसाचा खोडा, खेळपट्टीवर कव्हर्स
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला वेळेवर सुरुवात झाली. पण
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला वेळेवर सुरुवात झाली. पण 4.2 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवावा लागला. पल्लेकेलेच्या खेळपट्टी आणि मैदानाला कव्हर्सने झाकण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल डगआऊटमध्ये परतले आहेत पाकिस्तानचा संघही पेव्हेलिअनमध्ये गेला आहे. सामना वेळेवर सुरु झाला पण पावसाने व्यत्यय आणल्यामुळे चाहत्यांमध्ये निराशाचे वातावरण आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने महत्वाच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात केली. पावसामुळे सामना थांबला, तोपर्यंत भारताने 4.2 षटकात बिनबाद 15 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने 18 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी केली आहे. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. तर शुभमन गिल याला आठ चेंडूनंतरही अद्याप खाते उघडता आले नाही. आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात होईल.
The covers are coming off at Pallekele Stadium. pic.twitter.com/VkUur7hLq0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 2, 2023
Good news: Rain stopped & covers are getting removed. pic.twitter.com/FhEou50OWD
— Johns. (@CricCrazyJohns) September 2, 2023
भारताचा कर्णधार रोहित शर्माने हायहोल्टेज सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह याचे टीम इंडियात कमबॅक झालेय. तर दुसरीकडे पाकिस्तानने नेपाळविरोधातील विजयी संघ मैदानात उतरवला आहे. नाणेफेकीनंतर बोलताना बाबर आझम याने प्रथम फलंदाजी करायची होती, असे सांगितले. रोहित शर्माने मोक्याच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आता सामना कोणत जिंकणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मोहम्मद शामी याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालेले नाही. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या जोडीला शार्दूल ठाकूर याला स्थान दिलेय. मध्यक्रममध्ये श्रेयस अय्यर याचे कमबॅक झालेय. पाकिस्तानच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पाकिस्तानची प्लेईंग 11
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी
भारताची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज