एक्स्प्लोर

IND vs NZ 1St ODI: न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये संजू सॅमसनची वापसी

India vs New Zealand: ऑकलंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. तर टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये संजू सॅमसन आणि उमरान मलिकचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन.

India vs New Zealand: टीम इंडिया (Tam India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (IND vs NZ ODI) पहिला सामना आज ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात संजू सॅमसनला बऱ्याच कालावधीनंतर संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यात उमरान मलिकचंही संघात पुनरागमन झालं आहे. 

या सामन्यापूर्वी टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात ऑकलंडमध्ये तब्बल 9 वेळा सामना खेळवण्यात आला आहे. ज्यामध्ये टीम इंडियानं केवळ 3 वेळा विजयाला गवसणी घातली आहे. म्हणजेच, या मैदानावर न्यूझीलंडचा थोडा वरचष्मा असल्याचं क्रिडा विश्लेषकांचं मत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपला रेकॉर्ड सुधारत विजयाला गवसणी घालणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

संजू सॅमसनची वापसी 

भारतीय क्रिकेट संघातील युवा विकेटकिपर आणि फलंदाड संजू सॅमसनची अखेर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वापसी झाली आहे. संजूचा बऱ्याच काळानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी संजूनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात संजूशिवाय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक यांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे. या सामन्यातून दोन्ही गोलंदाज वनडेत पदार्पण करणार आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन 

न्यूझीलंड : फिन एलेन, डेवोन कॉनवे, केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, मॅट हेनरी, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन

टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

ऑकलंडमधील हवामानाचा अंदाज

शुक्रवारी ऑकलंडमध्ये ढगाळ वातावरण आहे. वाराही सतत वाहत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत होऊ शकते. तसेच, आज ऑकलंडमधील तापमान 18 अंश सेल्सिअस असेल. तसेच, आजच्या सामन्या दरम्यान पावसाची शक्यता नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : मतदान करायला लागतंय! राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या चार तासात देशाच्या तुलनेत थंडा प्रतिसाद
मतदान करायला लागतंय! राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या चार तासात देशाच्या तुलनेत थंडा प्रतिसाद
"भाजपचे कार्यकर्ते प्रचार करतायत.."; भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्सोवा मतदान केंद्रावर वादावादी
Lok Sabha Election 2024 : सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
Sharad Pawar: पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sunil Raut : कुणाचा कितीही दबाव आला तरी संजय दिना पाटील दिल्लीत जाणारShrikant Shinde Voting Lok Sabha : विरोधकांना पराभव समोर दिसतोय; श्रीकांत शिंदेLata Eknath Shinde Thane Lok Sabha : श्रीकांत शिंदे निवडून आलेच आहेत, लेकाच्या विजयाचा आईला विश्वासLok Sabha : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते Dharmendra, अभिनेत्री Hema Malini यांनी बजावला मतदानाचा हक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : मतदान करायला लागतंय! राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या चार तासात देशाच्या तुलनेत थंडा प्रतिसाद
मतदान करायला लागतंय! राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पहिल्या चार तासात देशाच्या तुलनेत थंडा प्रतिसाद
"भाजपचे कार्यकर्ते प्रचार करतायत.."; भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्सोवा मतदान केंद्रावर वादावादी
Lok Sabha Election 2024 : सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
Sharad Pawar: पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
पंतप्रधान प्रचंड घाबरलेत, म्हणूनच मला भटकती आत्मा म्हणाले : शरद पवार
Maharashtra HSC Results: बारावीच्या परीक्षेचा भोपळा फुटणार, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, निकाल कसा आणि कुठे पाहाल?
बारावीच्या परीक्षेचा भोपळा फुटणार, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, निकाल कसा आणि कुठे पाहाल?
Sharad Ponkshe : पप्पा म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं, लेक म्हणाला मलापण मोदीच हवेत; पोंक्षे पितापुत्राचं थेट मत, नो गडबड!
पप्पा म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं, लेक म्हणाला मलापण मोदीच हवेत; पोंक्षे पितापुत्राचं थेट मत, नो गडबड!
Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेसाठी पहिल्या चार तासात राजभाऊ वाजेंच्या सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान, पाहा Photos
नाशिक लोकसभेसाठी पहिल्या चार तासात राजभाऊ वाजेंच्या सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान, पाहा Photos
Maharashtra Loksabha Election : राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? एमआयएम आमदाराने थेट आकडा सांगितला
राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? एमआयएम आमदाराने थेट आकडा सांगितला
Embed widget