Ind vs Nz 3rd Test : 5,11,1,1,1... नाम बड़े और दर्शन छोटे... मुंबईत टीम इंडियाने लावली विकेटची 'माळ'! वानखेडेवर टॉप ऑर्डरचा पर्दाफाश
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 29 धावांत पाच विकेट गमावल्या.
India vs New Zealand 3rd Test : नाम बड़े और दर्शन छोटे.... मुंबई कसोटीतील दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी पाहिली तर तुम्ही पण हेच म्हणाला. 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 29 धावांत पाच विकेट गमावल्या. रोहित शर्मा (11), शुभमन गिल (1), विराट कोहली (1), यशस्वी जैस्वाल (5) आणि सर्फराज खान (1) पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघावर क्लीन स्वीपचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय फलंदाजांनी आपल्याच घरात फिरकी विकेट्सवर कमकुवत असल्याचे सिद्ध केले आहे. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा आहे. टीम इंडियाला अजूनही 116 धावांची गरज आहे.
Senior pros seriously off-colour, the next in line looking very confused with their red ball game plans.
— Gauti Harshit Dhiman (GG Ka Parivar) (@GautiDhiman) November 3, 2024
Time to take some tough calls just like PCB, they dropped Babar & Shaheen, we also need to drop our big players now #INDvNZ pic.twitter.com/kKosEc4a2k
टीम इंडियाने मुंबई कसोटी सामन्यावर आपली पकड कायम ठेवली होती, हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 147 धावांचे लक्ष्य मिळाले, मात्र पुन्हा एकदा रोहितची सेना फलंदाजीमध्ये सुपर फ्लॉप ठरत आहे. या मालिकेत न्यूझीलंड संघाने आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे, अशा स्थितीत टीम इंडियाने 12 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका गमावली आहे. दुसरीकडे, प्रत्येक पराभवाने टीम इंडियाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भंग पावत आहे.
Hello 👋 Lawrence Bishnoi ...
— Brahamanandam 🎯 (Parody) (@Brahman32335480) November 3, 2024
Ek kaale hiran ko AJAZ PATEL bhi Maara hai. 🥲🥲 #INDvNZ pic.twitter.com/GyQSk5mj2j
जडेजाने पुन्हा एकदा उघडला पंजा
एकीकडे टीम इंडियाचे फलंदाज सातत्याने निराशा करत आहेत, तर दुसरीकडे मुंबई कसोटी सामन्यात जडेजाने शानदार गोलंदाजी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जडेजाने पहिल्या डावात 5 बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावातही 5 बळी घेतले. अशा स्थितीत या खेळाडूच्या कामगिरीवर चाहते चांगलेच खूश आहेत, मात्र फलंदाजांवर चाहत्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळायची आहे आणि या मालिकेत एकूण 5 कसोटी सामने होणार आहेत.
Like this tweet if you think sarfaraz is only good for ranji trophy 🏆
— HYBRID X TVD (@hybridxtvd) November 3, 2024
" Mumbai lobby politics"#INDvNZ #INDWvNZW #SarfarazKhan pic.twitter.com/5RjPH4LYtX
हे ही वाचा -
Rohit Sharma Ind vs Nz Test : हिटमॅनची ताकद बनली मोठी कमजोरी? मुंबई कसोटीतही रोहितचा 'फ्लॉप शो'