(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ 3rd T20: भारत-न्यूझीलंड अहमदाबादच्या मैदानावर भिडणार, या निर्णायक सामन्यासंबधी सर्व माहिती एका क्लिकवर
India vs New Zealand 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना बुधवारी अर्थात 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
IND vs NZ, 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या म्हणजेच बुधवारी (1 फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत उद्या जो कोणी जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल. तर या निर्णायक मॅचपूर्वी सामन्यासंबंधी सर्व माहिती जाणून घेऊया...
सामना होणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाज दमदार कामगिरी करताना दिसून आले आहेत. 6 सामन्यांच्या 12 डावांमध्ये 10 वेळा 150+ धावा केल्या आहेत. यामध्ये, 5 वेळा संघांनी 180+ चा स्कोअर ओलांडला आहे. येथे सर्वोच्च धावसंख्या 224 धावांची आहे. फलंदाजांसाठी फायद्याच्या या विकेटवर 1 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
टॉस किती महत्त्वाचा?
आतापर्यंत येथे झालेल्या 6 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकले असले तरी ते एकतर्फी पद्धतीने जिंकले. अशा परिस्थितीत येथे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
बुधवारी अहमदाबादचे हवामान कसे असेल?
सामन्यादरम्यान अहमदाबादचे हवामान क्रिकेट खेळण्यासाठी अगदी योग्य असेल. तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. पावसाचीही शक्यता नाही. अशा स्थितीत सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल.
टीम इंडियाने दोन वर्षांपासून टी-20 मालिकेत अंजिक्य
भारतीय संघाने मागील दोन वर्षांपासून एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाचा शेवटचा पराभव श्रीलंकेकडून जुलै 2021 मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर झाला होता. श्रीलंकेने घरच्या मैदानावर ही तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी त्यांनी जिंकली होती.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल/पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, उमरान मलिक/शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - ड्वेन कॉन्वे (विकेटकीपर), फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉरी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि जेकब डफी.
हे देखील वाचा-