एक्स्प्लोर

IND vs NZ, 3rd ODI : भारताचा न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश, 90 धावांनी जिंकला अखेरचा सामना

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारतानं आधीच जिंकला होता. तिसरा सामनाही भारतानं जिंकत मालिकाही खिशात घातली आहे.

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारतानं 90 धावांच्या फरकानं जिंकत मालिका खिशात घातली आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारताने एका अप्रतिम खेळीचं प्रदर्शन घडवलं असून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत कमाल केली आहे. आधी भारतीय सलामीवीरांनी दोघांनी शतकं ठोकली. शुभमन गिलनं 112 आणि रोहित शर्मानं 101 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पांड्यानंही तुफानी फटकेबाजी करत 54 धावांची दमदार खेळी केली. ज्यामुळे भारतानं 50 षटकांत 385 धावा करत न्यूझीलंडला 386 धावांचं लक्ष्य दिलं. जे पार करताना डेव्हॉन कॉन्वेनं 138 धावांची खेळी केली, पण इतर कोणाची साथ न मिळाल्यानं अखेर न्यूझीलंड 90 धावांनी पराभूत झाला. 

पहिल्या दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या भारतानं आज नाणेफेक गमावली, न्यूझीलंडनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील काही सामन्याप्रमाणे भारतानं आजही तुफान फलंदाजी करत तब्बल 386 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सर्वात आधी सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी सुरु ठेवली. दोघांनी आपआपली शतकं पूर्ण केली, ज्यामुळे भारताची धावसंख्याही 200 पार गेली. रोहित 101 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर काही वेळात शुभमनही 112 धावा करुन तंबूत परतला. विराटनं 36 धावांची खेळी केली पण तोही तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पांड्यानं 54 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामुळे भारताची धावसंख्या आणखी मजबूत झाली. 385 धावा भारताने स्कोरबोर्डवर लावल्या असून आता न्यूझीलंडला 386 धावा 50 षटकांत करायच्या होत्या.

न्यूझीलंडचा संघ 386 धावा करण्यासाठी मैदानात आला असताना सुरुवातीला त्यांनी ठिकठाक खेळी केली. पण काही विकेट्स गेल्यावर इतर फलंदाज झटपट बाद झाले अखेर  41.2 षटकांत 295 धावांवर न्यूझीलंडचा संघ सर्वबाद झाला आणि भारताने 90 धावांनी सामना जिंकला. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वेने 138 धावांची एकहाती झुंज दिली. याशिवाय हेन्री निकोल्सने 42 आणि मिचेल सँटनरनं 34 धावांची खेळी केली पण अखेर न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला. भारतानं श्रीलंकेनंतर न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश दिला आहे. सामनावीर म्हणून शार्दूल ठाकूर तर मालिकावीर म्हणून शुभमन गिलला पुरस्कृत करण्यात आलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Team India (@indiancricketteam)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
×
Embed widget