IND vs NZ 2nd T20 : आधी सूर्यकुमारचं शतक, मग दीपक हुडाच्या 4 विकेट्स, भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवत, मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
India vs New Zealand, Match Highlights : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवला आहे. आधी फलंदाजी करत भारताने सूर्यकुमार यादवच्या (suyakumar Yadav) नाबाद 111 धावांच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान ठेवले. जे पूर्ण करताना न्यूझीलंडचा संघ 126 धावांत सर्वबाद झाला. दीपक हुडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे सामना भारताने 65 धावांनी जिंकला.
A convincing victory for #TeamIndia as they beat New Zealand by 65 runs with 7 deliveries to spare.
— BCCI (@BCCI) November 20, 2022
India lead the series 1-0.
Scorecard - https://t.co/mIKkpD4WmZ #NZvIND pic.twitter.com/BQXGGGgbx5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात ठिकठाक झाली. ईशान किशन (Ishan Kishan) चांगली फलंदाजी करताना दिसत होता. पण पंत 13 चेंडूत 6 धावा करुन बाद झाला. मग सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि त्यानेही फटकेबाजी सुरु केली. तितक्यात ईशान किशन 36 धावा करुन बाद झाला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि हार्दिक (Hardik Pandya) यांनीही प्रत्येकी 13 धावा केल्या. पण सूर्युकमार मात्र तोवर तुफान फॉर्मात आला होता. तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होता. 49 चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं. भारत 200 पार जाईल असं वाटत होतं. पण अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं हॅट्रीक घेतली. ज्यामुळे भारत 191 धावा करु शकला,
192 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. शून्यावर त्यांचा सलामीवीर बाद झाला. भुवनेश्वरने फिन अॅलनला बाद केलं. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांना खास खेळी करताच येत नव्हती. कर्णधार केन विल्यमसनने एकहाती 61 धावांची झुंज दिली, पण सिराजने त्याला बाद करत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा संपवल्या. भारताकडून दीपक हुडाने उत्कृष्ट गोलंदाजी करत तब्बल 4 विकेट्स घेतल्या. चहल-सिराजने प्रत्येकी 2 आणि भुवी आणि सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेत 18.5 षटकांत न्यूझीलंडला सर्वबाद केलं आणि सामना 65 धावांनी भारतानं जिंकला. सामनावीर म्हणून सूर्यकुमारला गौरवण्यात आलं.
भारताची मालिकेत आघाडी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. वेलिंग्टनमध्ये होणारा सामना रद्द झाल्यानंतर आज दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यामुळे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता मंगळवारी तिसरा सामना खेळवला जाणार असून भारताने तो जिंकल्यास मालिकाही भारत जिंकल, तसंच न्यूझीलंडने सामना जिंकल्या मालिका अनिर्णीत सुटणार आहे.
हे देखील वाचा-