IND vs NZ 2nd ODI Playing 11: दिपक चहर आणि हुडाचं संघात कमबॅक; न्यूझीलंडच्या संघातही एक बदल
IND vs N हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
IND vs NZ 2nd ODI: हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. न्यूझीलंडचा संघ विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल. तर, या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या महत्वाच्या सामन्यात दोन्ही संघात काही बदल पाहायला मिळाले आहेत.
ट्वीट-
🚨 Team News 🚨
— BCCI (@BCCI) November 27, 2022
2⃣ changes for #TeamIndia as @HoodaOnFire & @deepak_chahar9 are named in the team. #NZvIND
Follow the match 👉 https://t.co/frOtF82cQ4
A look at our Playing XI 🔽 pic.twitter.com/MnkwOy6Qde
भारतीय संघात दोन तर, न्यूझीलंडच्या संघात एक बदल
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शिखर धवननं संजू सॅमसनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय. तर, ऋषभ पंतला पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. याशिवाय, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरऐवजी दिपक चहरला संघात स्थान देण्यात आलंय. दुसरीकडं न्यूझीलंडच्या संघातही एक बदल करण्यात आलाय. अॅडम मिल्नेऐवजी मिचेल ब्रेसवेलला संघात स्थान दिलंय.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन.
भारताचा सात विकेट्सनं पराभव
पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर 307 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर टॉम लॅथमचं नाबाद शतक आणि केन विल्यमसनच्या नाबाद 94 धावांच्या खेळीमुळं किवी संघानं हा सामना सात विकेट्सनं जिंकला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरनं सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. याशिवाय, कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्याही बॅटमधून अर्धशतकं झळकली.
हे देखील वाचा-