India vs Ireland T20I : बुमराह, रिंकूसह 'या' पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा
IND Vs IRE, 2nd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज दुसरा टी 20 सामना होणार आहे.
IND Vs IRE, 2nd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज दुसरा टी 20 सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. या सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. आजच्या सामन्यात कोणत्या पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्यात ते पाहूयात...
1 – जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहने वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेय. आशिया चषक आणि विश्वचषकाच्या दृष्टीने बुमराहची कामगिरी भारतीय संघासाठी महत्वाची आहे. पहिल्या टी 20 सामन्यात बुमराहने भेदक मारा केला होता. जसप्रीत बुमराह याने पहिल्या सामन्यात पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय 19 व्या षटकात फक्त एक धाव दिली होती. आज बुरराह कशी कामगिरी करतो, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
2 – पॉल स्टर्लिंग
आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याच्या कामगिरीकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा आहेत. पॉल स्टर्लिंग याला पहिल्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो स्वस्तात तंबूत परतला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पॉल स्टर्लिंग याने भारताविरोधात आतापर्यंत चार सामने खेळलेत, पण त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. स्टर्लिंग याने चार टी 20 सामन्यात फक्त 11.25 च्या सरासरीने फक्त 45 धावा केल्या आहेत. 40 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी 20 क्रिकेटमध्ये पॉल स्टर्लिंग याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात स्टर्लिंग याच्याकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.
3 – रिंकू सिंह
18 ऑगस्ट रोजी रिंकू सिंह याने भारतीय संघात पदार्पण केले होते. पण या सामन्यात रिंकू सिंह याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. रिंकू सिंह याने आयपीएलमध्ये सलग पाच षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. आयर्लंड दौऱ्यात रिंकू सिंह कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात रिंकू याने धावांचा पाऊस पाडला होता. आज फलंदाजीची संधी मिळाल्यास रिंकू कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.
4 – तिलक वर्मा
तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरोधातील टी 20 मालिकेत दमदार कामगिरी केली होती. लितक वर्मा याने दणक्यात पदार्पण करत टीम इंडियातील जागा निश्चित केली आहे. पहिल्या टी 20 सामन्यात तिलक वर्माला खातेही उघडता आले नव्हते. त्यामुळे आज तो कशी फलंदाजी करतो, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्यात. स्विंग गोलंदाजीसमोर तिलक कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. आयर्लंडविरोधात तिलक वर्माने दमदार प्रदर्शन केल्यास टीम इंडियातील त्याचे स्थान निश्चित मानले जातेय.
5 – हॅरी टेक्टर
20 वर्षीय हॅरी टेक्टर याने मागील काही दिवसांत दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. गतवर्षी भारताविरोधात त्याने दोन सामन्यात नाबाद 64 आणि 39 धावांची शानदार खेळी केली होती. पहिल्या सामन्यात टेक्टर याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आज तो ककशी फलंदाजी करतो, याकडे आयर्लंडच्या नजरा खिळल्या आहेत. हॅरी याने आतापर्यंत 62 टी 20 सामन्यात 23 च्या सरासरीने 1029 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.