IND vs IRE, 2nd T20 Live : आयर्लंडची झुुंज व्यर्थ, भारताचा 4 धावांनी विजय
IND vs IRE : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 29 Jun 2022 12:43 AM

पार्श्वभूमी
IND vs IRE, Live : भारतीय संघाला आज आयर्लंड संघाला मात देऊन मालिका 2-0 ने जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडला 7 विकेट्सने मात दिल्यावर आज दुसरा सामना भारतीय संघ...More
IND vs IRE, Live : भारतीय संघाला आज आयर्लंड संघाला मात देऊन मालिका 2-0 ने जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडला 7 विकेट्सने मात दिल्यावर आज दुसरा सामना भारतीय संघ खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील दुसरा टी20 सामना आज आयर्लंडच्या मैदानावर खेळवला जात आहे. आयर्लंडमधील डबलिन क्रिकेट स्टेडियमवर (Castle Avenue, Dublin) हा सामना खेळवला जात असून आजवर आयर्लंडने एकदाही भारताला मात दिलेली नाही.आयर्लंडच्या द व्हिलेज, डबलिन क्रिकेट स्टेडियमवर आज सामना होणार असून या ठिकाणी आजवर चार टी20 सामने झाले असून यात एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला असून तीन सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यात मैदानाच्या खेळपट्टीवर गवत अधिक असल्याने गोलंदाजांना फायदा होतोच पण फलंदाजही चांगली कामगिरी करु शकतात. पहिल्या सामन्यातही हार्दिक फलंदाजी घेऊ इच्छित होता, पण पावसाच्या वातावरणामुळे त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आज नेमकं कोण नाणेफेक जिंकेल? आणि कोणता निर्णय़ घेईल हे पाहणं औत्सुक्याचं राहिल.कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11?भारत - ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.आयर्लंड - अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, बॅरी मॅकार्थी, कॉनर ऑफ्लर्ट, पॉल स्टलिंर्ग, लॉर्कन टकर, क्रेग यंग.हे देखील वाचा-ENG vs IND: बर्घिंगहॅम कसोटीत भारतासमोर मोठं आव्हान, मास्टर प्लॅनसह इंग्लंडचा संघ उतरणार मैदानातIND vs ENG: इंग्लंडमध्ये पाच भारतीय गोलंदाजांनी दाखवली जादू, ईशान शर्मा यादीत अव्वलArjun Tendulkar: जिनं विराटला प्रपोज केलं, आता त्याच महिला क्रिकेटरसोबत फिरतोय अर्जून तेंडूलकर!IRE vs IND: अख्ख्या भारतीय संघाशी एकटाच भिडलेल्या हॅरी टेक्टर आहे तरी कोण?
IND vs IRE : आयर्लंडची कडवी झुंज, भारताचा 4 धावांनी विजय
आयर्लंडच्या खेळाडूंनी अप्रतिम झुंज दिली, पण अखेर भारतीय संघ 4 धावांनी जिंकला आहे.