IND vs ENG Test Series: इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का, दुखापतीमुळं टीम इंडियाचा माजी कर्णधार संघाबाहेर?
IND vs ENG Test Series: सध्या भारतीय खेळाडू आयपीएल खेळत आहेत. आयपीएलचा पंधरावा हंगाम अखेरच्या टप्प्यावर आहे.
IND vs ENG Test Series: सध्या भारतीय खेळाडू आयपीएल खेळत आहेत. आयपीएलचा पंधरावा हंगाम अखेरच्या टप्प्यावर आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाचं पुढील वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताशी पाच टी-20 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र, यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त झाला असून तो इंग्लंड दौऱ्यातून मुकण्याची शक्यता आहे.
अजिंक्य राहाणेला दुखापतीतून सावरण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी लागणार
क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार, यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला दुखापत झाली आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्याला ग्रेड- थ्री हॅमस्ट्रिंग आहे. ज्यामुळं त्याला इंग्लंड दौऱ्यातून मुकावं लागू शकतं. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता
दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारताच्या अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. तर, आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळू शकते. यात तिलक वर्मा, उमरान मलिका, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांचा समावेश आहे.
भारतीय निवड समिती दोन संघाची निवड करणार
लवकरच निवड समिती भारतीय संघाची घोषणा करणार आहे. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीनं रहाणे आणि पुजाराच्या जागेवर आपलं नाव निश्चित केलं आहे. पुजारानं काऊंटी चॅम्पयशिप क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे. ज्यामुळं त्याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवड समिती दोन संघाची निवड केली जाणार आहे. यातील एक संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जून ते 19 जूनपर्यंत पाच सामन्यांची टी-20 मालिके खेळणार आहे. गेल्या वर्षीही असंच झालं होतं. सिनियर खेळाडूंचा एक संघ इंग्लंडशी कसोटी मालिका खेळत होता. तर, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या संघानं श्रीलंकेचा दौरा केला होता.
हे देखील वाचा-
- Women T20 Challenge: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघ जाहीर; मिताली राज, झुलन गोस्वामीला विश्रांती
- IPL 2022: वय म्हणजे फक्त एक आकडा! आयपीएलच्या पंधराव्या हंगामात धोनीसह'या' खेळाडूंनी गाजवलं मैदान
- PBKS vs DC, Pitch Report : पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?