IND vs ENG 2nd Test : केएल राहुलचं शतक, टीम इंडियासाठी खास ठरला दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस
India vs England 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांसाठी खास ठरला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची धडाकेबाज खेळी केली.
India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांसाठी खास ठरला. पहिल्यांदा रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची धडाकेबाज खेळी केली. रोहित शर्माचं शतक मात्र हुकलं, तो 83 धावांवर आउट जाला. तर केएल राहुलनं कसोटी क्रिकेटमधील आपलं सहावं शतक पूर्ण केलं. दिवसाअखेर केएल राहुल 127 आणि अजिंक्य रहाणे 01 धावांवर नाबाद तंबूत परतले. इंग्लंडच्या वतीनं जेम्स एंडरसननं दोन आणि ओली रॉबिन्सननं एक विकेट घेतला. राहुलनं आपल्या डावात आतापर्यंत 12 चौकार आणि एक षट्कार लगावला आहे.
असा होता लॉड्स कसोटीचा पहिला दिवस :
केएल राहुल (नाबाद 127) आणि रोहित शर्मा (83) च्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावत 276 धावांची खेळी केली.
टॉसच्या वेळी पाऊस आल्यामुळे सामना जवळपास अर्धा तासानं सुरु करण्यात आला. इंग्लंडनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली राहिली आणि रोहित शर्मा, केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, रोहित शर्माचं शतक मात्र हुकलं आणि तो 145 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि एक षट्काराच्या मदतीनं 83 धावा करत बाद झाला. फलंदाज म्हणून मैदानावर उतरलेल्या चेतेश्वर पुजारानं 23 चेंडूंवर एक चौकार लगावत नऊ धावा केल्या आणि बाद झाला.
त्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीनं 103 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला धावांचा डोंगर रचण्यास मदत केली. पण, कोहली 103 चेंडूंमध्ये तीन चौकार लगावत 42 धावा करुन माघारी परतला.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना
इंग्लंडविरुद्धच्य पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज होती. टीम इंडियाकडे 9 विकेट्स शिल्लक होत्या मात्र शेवटच्या दिवशीचा खेळ पावसामुळं होऊच शकला नाही. पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपुष्टात आला होता. तर भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 52 धावा केल्या होत्या. इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. भारताकडून पहिल्या डाव चार विकेट्स घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या.
पहिल्या डावात इंग्लंडला भारताने 183 धावांवर गुंडाळले होते. कर्णधार रुटच्या अर्धशतकाशिवाय कुणीही मोठी खेळी करु शकलं नाही. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूरच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ 183 धावांवर आटोपला. इंग्लंडचा डाव 183 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 97 धावांची दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राहुल आणि जाडेजा वगळता टीम इंडियाकडूनही कुणाला मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावा केल्या होत्या. त्यामुळं भारताचा पहिला डाव 278 धावांवर गुंडाळला. भारताकडून राहुलनं 84, जाडेजानं 56 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात रॉबिन्सननं 5 तर अॅंडरसननं 4 विकेट्स घेतल्या होत्या.