IND vs ENG 2nd T20 Score Live : भारताचा इंग्लंडवर विजय, मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी
IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामना आज बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात रंगणार आहे.
LIVE
Background
India vs England Live : आज भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात दुसरा टी20 सामना बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात रंगणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा टी20 सामना आहे. पहिल्या टी20 मध्ये भारताने 50 धावांनी विजय मिळवल्यानंतर आज दुसरा सामना खेळवला जात आहे. भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिकेत भारत 2-0 ची विजयी आघाडी घेईल, तर इंग्लंडने सामना जिंकल्यास ते मालिकेत 1-1 ची बरोबरी साधतील. आज सामना होणाऱ्या मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी फायद्याची असल्याने एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळू शकतो.
आज सामना होणाऱ्या एजबेस्टनच्या मैदानात सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना चांगली गती मिळून विकेट मिळतात. पण जस-जसा सामना पुढे जातो पिचवर फलंदाजी करणं अधिक सोपं होतं. यामुळेच याठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. या मैदानावर टी20 सामन्यांत सरासरी स्कोर 160 रन इतका असून बहुतांश वेळी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेऊ इच्छित असतो.
अशी असू शकते दोन्ही संघाची अंतिम 11?
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह
इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, मॅथ्यू पार्किंसन आणि रिचर्ड ग्लीसन
हे देखील वाचा-
- India vs West Indies 2022 : वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेत कोहली, शर्मा, पंत मैदानात उतरणार, समोर आली मोठी माहिती
- Watch Video : ...म्हणून भुवनेश्वर कुमार भारताचा 'स्विंगमास्टर', भुवीने बटलरची विकेट घेतलेली डिलेव्हरी पाहिलीत का?
- IND vs ENG: दुसऱ्या टी-20 मध्ये कोहली, पंत, बुमराह आणि जाडेजाचं पुनरागमन; कोणत्या खेळाडूंचा पत्ता होणार कट?
IND vs ENG : भारताचा 49 धावांनी विजय
भारताने आधी फलंदाजी करत 170 धावांचे दिलेले आव्हान इंग्लंडला पूर्ण करु दिलेले नाही. भेदक गोलंदाजी करत 121 धावांत त्यांना सर्वबाद केलं आहे. ज्यामुळे सामना भारताने 49 धावांनी जिंकत मालिकेतही 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.