(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG: दुसऱ्या टी-20 मध्ये कोहली, पंत, बुमराह आणि जाडेजाचं पुनरागमन; कोणत्या खेळाडूंचा पत्ता होणार कट?
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात काल तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं 50 धावांनी विजय मिळवून मालिकेवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात काल तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं 50 धावांनी विजय मिळवून मालिकेवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), ऋषभ पंत (Rishabh Pant), जसप्रीत बुमराह (Japrit Bumrah) आणि रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, 9 जुलै 2022 रोजी भारत इंग्लंडशी दुसरा टी-20 सामन्यात या सर्व खेळाडूंचं पुनरागमन होणार आहे. यामुळं पहिल्या टी-20 मध्ये खेळलेल्या कोणकोणत्या खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, हे जाणून घेऊता.
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेबाबत बीसीसीआयची महत्वाची घोषणा
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली होती. त्यानुसार, पहिल्या टी-20 सामन्यासाठी वेगळा आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी साठी वेगळ्या संघाची घोषणा केली होती.यामुळं इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना जिंकल्यानंतरही अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे, आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंहची केवळ पहिल्या टी-20 साठी संघात निवड करण्यात आली होती. तसेच ईशान किशन, अक्षर पटेल यांनाही संघातून वगळण्यात येऊ शकतं.
म्हणून या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली
भारत आणि इंग्लंड यांच्यात 1-5 जुलैदरम्यान रिशेड्युल केलेला कसोटी सामना खेळला गेला. बर्मिंगहॅम कसोटी सामना आणि टी-20 मालिका यांच्यात जास्त दिवसांचं अंतर नसल्यानं खेळाडूंना पहिल्या टी-20 सामन्या विश्रांती देण्याचं बीसीसीआयनं ठरवलं होतं. ज्यामुळं विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा आणि ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली. आता हे सर्व खेळाडू दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 मध्ये खेळताना दिसतील.
हे देखील वाचा-