ENG vs IND, 2nd ODI, Toss Update : भारताला मालिकाविजयाची सुवर्णसंधी; नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
India vs England Toss Update : पहिल्या सामन्यात इंग्लंडला 10 विकेट्सने मात दिल्यानंतर आता भारत दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला असून नुकतीच नाणफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडनच्या प्रसिद्ध अशा लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारताने आपली अंतिम 11 देखील जाहीर केली असून यावेळी विराट कोहली संघात परतल्याचं समोर आलं आहे.
पहिला एकदिवसीय सामन्यातभारताने दमदार अशा गोलंदाजीचे आणि नंतर संयमी फलंदाजीचे दर्शन घडवत 10 विकेट्सनी मॅच जिंकली. ज्यानंतर आता दुसरा सामनाही जिंकून मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. यावेळी इंग्लंडने संघात एकही बदल केला नसून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली संघात परतला आहे. तर श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे, तर सामन्यासाठी नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे, यावर एक नजर फिरवूया...
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी
इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जो रुट, मोईन अली, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड विली, आर. टोप्ले, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स
पहिल्या सामन्यात भारत विजयी
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होत असून पहिला सामना जिंकत भारताने 1-0 ची आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
हे देखील वाचा-
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?
- India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?
- ENG vs IND, 2nd ODI, Pitch Report : क्रिकेटच्या पंढरीत रंगणार दुसरा एकदिवसीय सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर