Eng vs Ind 1st Test : इंग्लंडची मुसंडी! पाचव्या दिवशी विकेटसाठी हतबल टीम इंडिया, हेडिंग्ले कसोटी आता एकच 'फॅक्टर' वाचवणार?
लीड्स हेडिंग्ले मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस अत्यंत थरारक वळणावर पोहोचला आहे.

India vs England 1st Test Day 5 Leeds Weather : लीड्स हेडिंग्ले मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस अत्यंत थरारक वळणावर पोहोचला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला 10 विकेट्स घ्यायच्या होत्या, तर इंग्लंडला विजयासाठी 350 धावांची गरज होती. पण सकाळच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ ठेवलं.
पहिल्या सत्रात इंग्लंडने एकही विकेट न गमावता 24 षटकांत 9 धावा फटकावल्या. लंचच्या वेळी बेन डकेट 89 चेंडूत 64* आणि जॅक क्रॉली 93 चेंडूत 42* धावांवर नाबाद होते. सध्या इंग्लंडला विजयासाठी 254 धावांची गरज आहे, तर भारताला अजूनही सर्व 10 गडी बाद करावे लागतील. सध्या असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की पाचव्या दिवसाचे पहिले सत्र यजमान इंग्लंडच्या नावावर होते. त्यामुळे इंग्लंडचा वरचष्मा दिसतोय.
Lunch on Day 5 in Headingley
— BCCI (@BCCI) June 24, 2025
England 117/0 in the 4th innings, need 254 more runs
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/w42IEN59CU
हेडिंग्ले कसोटी टीम इंडियाला आता एकच 'फॅक्टर' वाचवणार?
पण, लीड्समध्ये ढगाळ वातावरण असून, ‘अॅक्युवेदर’नुसार आज पावसाची शक्यता तब्बल 84 टक्के आहे. दुपारी सामना सुरू झाला, त्याच वेळी लीड्समध्ये आकाशात काळे ढग जमले होते. संध्याकाळी 7:30 वाजता पावसाची शक्यता 60 टक्के तर रात्री 10:30 ला 50 टक्के आहे. म्हणजे कधीही पावसाचा व्यत्यय पडू शकतो.
इंग्लंडमध्ये हवामानाचे भाकीत नेहमीच अनिश्चित असते. इथे कधीही, कुठल्याही क्षणी पावसाची शक्यता असते, आणि याच गोष्टीचा आता भारताला आधार आहे. कारण खेळाचा कल पाहता, सामना वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या आशा आता केवळ पावसावर टिकल्या आहेत.
Zak Crawley and Ben Duckett take charge with a dominant century stand on the final day 💪
— ICC (@ICC) June 24, 2025
#WTC27 | #ENGvINDhttps://t.co/62moN1jfz9
भारताने दिलेले 371 धावांचे लक्ष्य सध्या इंग्लंड सहज गाठत असल्याचे चित्र आहे. गोलंदाज निष्प्रभ, फलंदाज आक्रमक आणि वरून हवामानही अनिश्चित अशा वेळी क्रिकेट चाहत्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. या कसोटीतील भारताचा पराभव टळणार का? की पावसामुळे भारताचे नशीब वाचणार? याचं उत्तर पुढील काही तासांत मिळेल.
UPDATE FROM LEEDS [📸: RevSportz]
— Johns. (@CricCrazyJohns) June 24, 2025
- It's overcast, dark clouds & gloomy to start the morning. pic.twitter.com/JznD2XVKIJ
हे ही वाचा -





















