(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND Vs ENG 1st Test Day 2 Tea: रुटच्या दुहेरी शतकामुळे इंग्लंड मजबूत स्थितीत, टीम इंडिया बॅकफूटवर
एमए चिदंबरम स्टेडियमवर यजमान भारतासोबत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवसापर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात 4 बाद 454 धावा केल्या आहेत.
India vs England: कर्णधार जो रूटच्या (नाबाद 209) कारकिर्दीतील पाचव्या दुहेरी शतकाच्या जोरावर इंग्लंडने एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतासोबत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवसापर्यंत पहिल्या डावात 4 बाद 454 धावा उभारल्या आहेत. चहा ब्रेकच्या वेळी रूटने 353 चेंडूत 19 चौकार आणि दोन षटकार ठोकले होते तर ओली पोप 73 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 24 धावांवर नाबाद आहे. पाचव्या विकेटसाठी आतापर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये 67 धावांची भागीदारी झाली आहे. इंग्लंडने दुसर्या सत्रात एक विकेट गमावून 99 धावा केल्या. भारताकडून बुमराहने दोन आणि अश्विन व नदीम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे.
दुपारच्या जेवणानंतर इंग्लंडने 355 धावांवर सुरुवात केली. रूटने 156 तर बेन स्टोक्सने 63 धावांनी आपली खेळी पुढे नेली. रूट आणि स्टोक्स यांनी चौथ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. स्टोक्सला चेतेश्वर पुजाराकरवी झेल देऊन नदीमने ही वाढती भागीदारी तोडली. स्टोक्सने आपल्या डावात 19 धावा जोडल्या आणि संघाच्या 387 च्या स्कोअरवर चौथा फलंदाज म्हणून बाद झाला. स्टोक्सने 118 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 82 धावा फटकावल्या.
IND vs ENG: पहिल्या दिवशी शतक ठोकणारा कर्णधार रुट धावसंख्येबाबत म्हणतो, 'इतक्या' धावा बनवणार
स्टोक्स बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या ओली पोपने इंग्लंडला टी ब्रेकपर्यंत आणखी कोणताही फटका बसू दिला नाही. टी ब्रेकपूर्वी रुटने आपले दुहेरी शतक पूर्ण केले. अश्विनला षटकार मारत त्याने आपले दुहेरी शतक पूर्ण केले. रूट हा पहिला इंग्लिश क्रिकेटपटू ठरला आहे की त्याने षटकार खेचत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. हे रूटचे देशाबाहेर तिसरे दुहेरी आणि शेवटच्या तीन कसोटीतील त्याचे दुसरे दुहेरी शतक आहे.
तत्पूर्वी, इंग्लंडने तीन बाद 263 धावांच्या पुढे खेळण्यास सुरवात केली. रूटने आपला डाव 128 धावांनी वाढवला. नवीन फलंदाज म्हणून स्टोक्स मैदानात उतरला. दोन्ही फलंदाजांनी फलक हलता ठेवला आणि पाहुण्या संघाला दुपारच्या जेवणापर्यंत कोणताही धक्का बसू दिला नाही.