IND vs ENG T20 Live Streaming : जिओ सिनेमा नाही तर 'इथं' फुकटात पाहा भारत-इंग्लंड टी-20 सामने, यासह सर्व Details एका क्लिकवर…
India vs England Live Telecast 1st T20I : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची टी-20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
India vs England Live Telecast : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची टी-20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे आणि दोन्ही संघ तिथे पोहोचले आहेत. रविवारी भारतीय संघाने पहिल्या सराव सत्रात घाम गाळला असताना, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. या टी-20 मालिकेत कामगिरी करून काही भारतीय खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करतील. त्याच वेळी काही खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते.
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना कधी, कुठे किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना बुधवार, 22 जानेवारी रोजी खेळला जाईल. जो कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी म्हणजे संध्याकाळी 6.30 वाजता टॉससाठी मैदानात उतरतील.
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना टीव्हीवर लाईव्ह कसा पाहायचा?
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकतात.
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना कुठे लाईव्ह स्ट्रीम केला जाईल?
डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी-20चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तर डीडी स्पोर्ट्सवर तुम्ही अगदी मोफत पाहू शकता. या सामन्याशी संबंधित नवीनतम अपडेट्ससाठी, तुम्ही एबीपी माझाच्या क्रिकेट पेजला भेट देऊ शकता.
भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 वेळापत्रक -
22 जानेवारी - पहिला टी-20 सामना, कोलकाता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता)
25 जानेवारी - दुसरा टी-20 सामना, चेन्नई (इंग्लंडमधील वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता)
28 जानेवारी - तिसरा टी-20, राजकोट (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता)
31 जानेवारी - चौथा टी-20, पुणे (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता)
2 फेब्रुवारी - पाचवा टी-20 सामना, मुंबई (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता)
भारत विरुद्ध इंग्लंड संघ -
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.
हे ही वाचा -