एक्स्प्लोर

Ind vs Ban: रोहित शर्माचा भर मैदानात जादूटोणा?; बेल्स फिरवून ठेवल्या, मंत्रही फुंकला; व्हिडीओ व्हायरल

Ind vs Ban Rohit Sharma: बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्माचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा एक शांत कर्णधार वाटत असला तरी त्याच्यामध्ये एक खोडकर मुलगा दडलेला आहे. या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. रोहित शर्मा मैदानाच्या आत असो की बाहेर, त्याची मजेशीर शैली नेहमीच पाहायला मिळते. कधी त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड होतो, तर कधी त्याच्या काही मजेदार कृती कॅमेऱ्यात कैद होतात. यावेळीही असेच काहीसे घडले. रोहित शर्माचे एक मजेदार कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्माचा (Rohit Sharma) मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा स्टम्पवरील बेल्सची अदलाबदल करताना दिसला. तसेच काहीतरी बोलून मंत्रही फुकल्याचे दिसून येतंय. याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटीत विराट कोहलीनेही बेल्सची अदलाबदल केली होती.

'भाई, कॅमेरा इधर है...', विराटचा इशारा-

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, प्रशिक्षक गौतम गंभीर हे ड्रेसिंग रुममध्ये बसले होते. भारताची फलंदाजी सुरु होती. यावेळी रोहित शर्मा शुभमन गिलला काहीतरी सांगत होता. दोघांची मस्ती सुरु असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचदरम्यान कॅमेरा रोहित शर्माकडे असतो आणि विराट कोहली रोहितला सांगतो की 'भाई, कॅमेरा इधर है'...कोहली बोलताच रोहित बघतो आणि काहीतरी बोलत पुढे बसलेल्या गौतम गंभीरच्या मागे लपतो. हे बघता ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या सर्वांना हसू अनावर होते. 

WTC च्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल-

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​अंतर्गत खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. टीम इंडिया आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती आणि आता या विजयासह संघाने भक्कम आघाडी घेतली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ 68.52 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर होता आणि अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र भारताची टक्केवारी आता 71.67 झाली आहे.
 
संबंधित बातमी:

वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
WTC Points Table : पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget