एक्स्प्लोर

IND vs BAN 2nd ODI: मेहंदी हसन आणि महमुदुल्लाहची विक्रमी भागिदारी; भारताविरुद्ध रचला इतिहास

भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सातव्या विकेट्ससाठी (7th wicket partneship against india) दोघांमध्ये 148 धावांची भागिदारी झाली.

IND vs BAN 2nd ODI:  भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मेहंदी हसन (Mehidy Hasan Miraz) आणि महमुदुल्लाह( mahmudullah) यांनी महत्वाची भागिदारी करत संघाची धावसंख्या 250 पार पोहचवली. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सातव्या विकेट्ससाठी (7th wicket partneship against india) दोघांमध्ये 148 धावांची भागिदारी झाली. बांगलादेशची धावसंख्या 69 वर असताना संघानं सहावी विकेट्स गमावली होती. मात्र, त्यानंतर मेहंदी हसन आणि महमुदुल्लाह यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत संघाचा डाव सावरला. या कामगिरीसह मेहंदी हसन आणि महमूदुल्लाहच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झालीय. 

ट्वीट-

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी भागिदारी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सातव्या विकेट्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या जोडींमध्ये मेहंदी हसन आणि महमूदुल्लाह यांचं नाव जोडलं गेलंय. यापूर्वी भारताविरुद्ध बांगलादेशसाठी सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम मोहम्मद सैफुद्दीन आणि शब्बीर रहमान यांच्या नावावर होता. या दोन्ही फलंदाजांनी 2019 मध्ये भारतीय संघाविरुद्ध सातव्या विकेट म्हणून 66 धावा जोडल्या. बांगलादेशची ही आतापर्यंतची कोणत्याही विकेट्साठीची सर्वात मोठी भागीदारी ठरलीय. मुशफिकर रहीम आणि अनामूल हक यांनी 2014 साली तिसऱ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली होती.

भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य
मेहंदी हसन मिराजच्या महत्त्वपूर्ण शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघर्ष करताना दिसला. बांगलादेशच्या संघानं निर्धारित 50 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि उमरान मलिकनं दमदार गोलंदाजी केली. 

भारतासाठी विजय आवश्यक
बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटनं पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळं या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत दुसरा एकदिवसीय सामना जिकणं आवश्यक आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटीलKalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकरArvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शनUddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
Embed widget