Deepak Chahar: जेवण तर नाहीच दिलं अन् सामानही हरवलं; दीपक चाहरचा मलेशिया एअरलाइन्ससोबतचा धक्कादायक प्रवास
India Tour Of India: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज दीपक चाहरचाही (Deepak Chahar) संघात समावेश आहे.
India Tour Of India: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज दीपक चाहरचाही (Deepak Chahar) संघात समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही तो भारतीय संघाचा भाग होता. यामुळं त्यानं न्यूझीलंडहून थेट बांगलादेश गाठलं. पण मलेशिया एअरलाइन्समधून (Malaysian Airlines) प्रवास करताना दीपक चाहरला बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करावा लागल्याचे त्यानं सांगितलंय.
मलेशियन एअरलाइन्सनं न्यूझीलंडहून ढाका 'बिझनेस क्लास'मध्ये प्रवास करूनही त्याचं सामान हरवलं आणि त्याला जेवणही दिलं गेलं नाही, असा दीपक चाहरनं दावा केलाय. "मलेशियन एअरलाइन्समध्ये प्रवास करण्याचा हा खूप वाईट अनुभव होता. आधी त्यांनी आमची फ्लाइट बदलली आणि आम्हाला त्याबद्दल माहितीही दिली नाही. त्यानंतर बिझनेस क्लासमध्ये जेवणही दिलं नाही. उद्या आम्हाला सामना खेळायचा असून आम्ही गेल्या 24 तासांपासून आमच्या सामानाची वाट पाहत आहोत", अशा आशायाचं दीपक चाहरनं ट्विट केलंय.
ट्वीट-
Had a worse experience traveling with Malaysia airlines @MAS .first they changed our flight without telling us and no food in Business class now we have been waiting for our luggage from last 24hours .imagine we have a game to play tomorrow 😃 #worse #experience #flyingcar
— Deepak chahar 🇮🇳 (@deepak_chahar9) December 3, 2022
मलेशिया एअरलाइन्सकडून दिलगिरी व्यक्त
मलेशिया एअरलाइन्सनं चहरला तक्रार नोंदवण्यासाठी लिंक पाठवली. पण ती लिंक उघडत नसल्याचं दीपक चाहरचं म्हणणं आहे. मलेशिया एअरलाइन्सनं ट्विटरवर प्रतिक्रिया दिली, "हे ऑपरेशनल, हवामानशास्त्रीय आणि तांत्रिक कारणांमुळे होऊ शकते." गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो." अनेक वेळा खेळाडूंना चुकलेल्या व्यवस्थापनामुळे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
मोहम्मद शामीऐवजी उमरान मलिकची संघात एन्ट्री
न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर दीपक चाहर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, शिखर धवन, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर हे क्राइस्टचर्चहून क्वालालंपूरमार्गे ढाका येथे पोहोचले. सूर्यकुमार यादव आणि उमरान मलिक यांनी थेट भारत गाठलं. पण दुखापतग्रस्त मोहम्मद शामीच्या जागी एकदिवसीय संघात समावेश करण्यात आल्यामुळं मलिकला आता बांगलादेशचा दौरा करावा लागणार आहे.
हे देखील वाचा-