IND vs BAN: तब्बल 12 वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन; जयदेव उनाडकट झाला इमोशनल, ट्विटरवर दिली 'अशी' प्रतिक्रिया
India Tour OF Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India Tour OF Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचा (Jaydev Unadkat) संघात समावेश करण्यात आलाय. तब्बव 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेव उनाडकटचं भारतीय संघात पुनरागमन झालंय. उनाडकटनं 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. दिर्घकाळानंतर संघात स्थान मिळाल्यानं उनाडकटनं एक खास ट्विट करत चाहत्यांसह अनेकांचे आभार मानले आहेत.
तब्बल 12 वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाल्यानंतर उनाडकटनं ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिलीय. "हे अगदी खरे आहे. हे त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सतत पाठिंबा दर्शवला. मी त्यांचा आभारी आहे'. जयदेव उनाडकटनं अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रानं विजय हजारे ट्रॉफी 2022 जिंकली. या स्पर्धेत त्यानं चागलं प्रदर्शन केलं. याच कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली.
ट्वीट-
Okay, looks like its real!
— Jaydev Unadkat (@JUnadkat) December 11, 2022
This one’s for all those who have kept believing & supporting me..
I am grateful 🤍
#267@BCCI pic.twitter.com/llLYXIRHMV
मोहम्मद शमीच्या जागी जयदेवची निवड
भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळं बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. त्याच्या जागी जयदेव उनाडकटचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेव उनाडकट भारतीय कसोटी संघाचा भाग बनलाय. त्यानं 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये एकमेव कसोटी खेळली होती. जयदेवनं भारतासाठी आतापर्यंत 1 कसोटी, 7 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भारताचा कसोटी संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.
बांगलादेश संघ:
शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
