IND vs BAN 2nd Test Day 4 Live Updates: अश्विन-अय्यर जोडीने सावरला डाव, भारताचा बांगलादेशवर तीन विकेट्सनी रोमहर्षक विजय
India tour of Bangladesh: ढाका येथील शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.
LIVE
Background
India vs Bangladesh 2nd Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना आजपापासून भारत खेळणार आहे. भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर आता दुसरा सामनाही खेळणार नसून त्याच्यासोबत युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep saini) हा देखील दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. बांगलादेशने देखील भारताविरुद्ध कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या सामन्यात बांगलादेशलाही मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच इबादतला दुखापत झाली होती.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट
बांगलादेशचा संघ-
शाकीब अल हसन (कर्णधार) , झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, नसुम अहमद, महमुदुल हसन खुशी, मोमिनुल हक, रजोर रहमान राजा, तस्कीन अहमद.
हे देखील वाचा-