IND vs BAN 2nd ODI Score Live: भारतानं एकदिवसीय मालिका गमावली, दुसऱ्या सामन्यात पाच धावांनी पराभव
IND vs BAN 2nd ODI Score Live Updates: या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सन पराभव स्वीकारावा लागला होता.
LIVE
Background
IND vs BAN 2nd ODI Score Live Updates: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सन पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. दुसरीकडं बांगलादेशचा संघ दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं शाहबाज अहमद आणि कुलदीप सेन यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याऐवजी अक्षर पटेल आणि उमरान मलिकला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देण्यात आलीय. तर, बांगलादेशच्या संघानं हसन महमूदच्या जागेवर नसुम अहमदचा संघात समावेश केलाय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची अतिशय खराब फंलदाजी केली होती. परंतु, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं बांगलादेशचा संघ डगमगताना दिसला. मात्र, मेहंदी हसन आणि मुस्ताफिजूर रहमाननं दहाव्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.
कधी, कुठं पाहणार सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश हा दुसरा एकदिवसीय सामना आज (7 डिसेंबर 2022) रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक झालं. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जातोय. या सामन्याचे लाईव्ह लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लीव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे सर्व अपडेट्स पाहता येतील.
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
बांगलादेशती प्लेइंग इलेव्हन:
नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान.
हे देखील वाचा-