IND vs AUS : दुसरा वन-डे सामना गमावताच टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम, एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा सर्वात मोठा पराभव
India vs Australia: विशाखापट्टणम येथे झालेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना भारताने 10 विकेट्सच्या फरकाने गमावल्यामुळे कागारुंनी मालिकेत 1-1 ची बरोबरी साधली आहे.
IND vs AUS, 2nd ODI- Full Match Highlights : ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभव पत्कारल्यानंतर दुसऱ्या वनडेत शानदार पुनरागमन करत एकतर्फी 10 गडी राखून विजय मिळवला. विशाखापट्टणम येथे खेळल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा डाव अवघ्या 117 धावांवर आटोपला, ज्यामध्ये मिचेल स्टार्कने 5 विकेट घेतल्या. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने अवघ्या 11 षटकांत हे लक्ष्य गाठून संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. इतक्या कमी षटकांत भारताला वन-डेमध्ये याआधी पराभूत कोणत्याच संघाने केलं नव्हतं.
View this post on Instagram
118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्याच षटकापासूनच आक्रमकपणे धावा काढण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्याला रोखणे भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे अशक्य वाटू लागले. ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली, तर मिचेल मार्शच्या बॅटने 36 चेंडूत 66 धावांची खेळी केली. दोघांनी अवघ्या 9 षटकांत संघाची धावसंख्या 100 धावांवर नेली. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो मिशेल स्टार्कने पूर्णपणे बरोबर सिद्ध केला. खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या शुभमन गिलच्या रूपाने डावाच्या पहिल्याच षटकात टीम इंडियाला धक्का बसला.
भारतीय संघाचे चार फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत
या सामन्यातील भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर ती अत्यंत खराब होती, ज्यामध्ये संघाचे 4 खेळाडू खातेही उघडू शकले नाहीत, याशिवाय केवळ ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. भारतीय संघासाठी विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. कांगारू संघाच्या गोलंदाजीत मिचेल स्टार्कने 8 षटकांत 53 धावा देत अर्धा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे काम केले. याशिवाय सीन अॅबॉटने 3 तर नॅथन एलिसने 2 बळी घेतले. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
हे देखील वाचा-