IND Vs AUS | वयाच्या 10व्या वर्षी वडीलांचं छत्र हरपलं, तरीही खेळला सामना; कोहलीशी मिळतीजुळीती विहारी हनुमाची कहाणी
IND Vs AUS : सिडनी कसोटीतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना ड्रॉ झाला. सामना ड्रॉ होणं हे भारतासाठी विजयापेक्षा कमी नव्हतं. याचं संपूर्ण श्रेय जातं, हनुमा विहारीला.
IND Vs AUS | सिडनी टेस्टमधील शेवटच्या दिवशी टीम इंडियाने शानदार फलंदाजीच्या जोरावर सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. तसं पाहायला गेलं तर सामना ड्रॉ होणं हे भारतासाठी विजयापेक्षा कमी नाही. कारण भारताने दुखापतग्रस्त असणाऱ्या खेळाडूंच्या मदतीनं हे यश मिळवलं आहे. हॅमस्ट्रिंग इंज्युरीचा सामना करणारा हनुमा विहारीने लंच सेशननंतर शेवटपर्यंत क्रीजवर नाबाद खेळी केली. त्यामुळे हा सामना ड्रॉ होण्याचं श्रेय हनुमा विहारीचं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु, हनुमा विहारी आहे तरी कोण?
कर्णधार विराट कोहलीने सीरिज सुरु होण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथसोबतच्या एका चर्चासत्रात सांगितलं होतं की, विहारी एक असा खेळाडू आहे, ज्याला विराटला सर्वात पुढे पाहायचं होतं. तसेच, कोहलीचं विहारीबाबत हे मत असण्यामागे कदाचित आणखी एक कारण असू शकतं.
वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी वडीलांचं छत्र हरपलं
हनुमा विहारीच्या आयुष्याची कहानी काहीशी विराट कोहलीसारखी आहे. कोहली जेव्हा 18 वर्षांचा होता, त्यावेळी रणजी ट्रॉफी दरम्यान, त्याच्या वडीलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनानंतरही कोहली रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या विरोधात खेळला होता.
विहारी जेव्हा 10 वर्षांचा होता, त्यावेळी त्याच्या वडीलांचं निधन झालं होतं. विहारी देखील आपल्या वडीलांच्या निधनानंतरही शाळेच्या फायनल मॅचमध्ये खेळला होता. विहारीला लहानपाणापासून ट्रेन करणारे कोच जॉन मनोज यांनी बोलताना सांगितलं की, "विहारी खरंचं खूप धैर्यवान आहे. आपल्या वडीलांच्या निधनानंतरही तो शाळेच्या फायनल मॅचमध्ये खेळला होता आणि 80 धावा केल्या होत्या. विहारीच्या आईने दिवंगत वडीलांच्या पेन्शच्या आधारावर विहारीचं संगोपन केलं आहे."
विहारीने 161 चेंडूंमध्ये नाबाद 23 धावा केल्या, जो दुहेरी अंकांपर्यंत पोहोचण्याचा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी आकडा आहे. विहारीने आपल्या 12 टेस्ट मॅचमध्ये आतापर्यंत केवळ एकच टेस्ट भारतात खेळली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विहारी टीम इंडियाच्या आवश्यकतेनुसार फलंदाजी करतो.
चौथ्या कसोटी सामन्यातून विहारी बाहेर
विहारी सध्या दुखापतीचा सामना करत आहे. विहारीची दुखापत गंभीर आहे आणि आता तो काही महिन्यांपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामन्यात हनुमा विहारी खेळू शकणार नाही.
येत्या 15 जानेवारीपासून सुरू होणार्या पुढील सामन्यापर्यंत विहारी फिट होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले आहे. हनुमा विहारीने आर अश्विनच्या साथीने 161 चेंडूत 23 धावा करून सिडनी कसोटी ड्रॉ करण्याची महत्वाची भूमिका निभावली.
महत्त्वाच्या बातम्या :