(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Australia, Sydney Test Records: 41 वर्षांनंतर टीम इंडियाने चौथ्या डावात खेळल्या 110 ओव्हर्स; आणखी काही रेकॉर्ड्सची नोंद
सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी 43.3 षटकांत 148 धावांची भागीदारी केली. यासह चौथ्या डावात सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम या दोघांनी आपल्या नावावर केला.
INDvsAUS | सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी ऐतिहासिक ड्रॉ झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 41 वर्षानंतर चौथ्या डावात भारताने 110 पेक्षा जास्त षटके फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या 407 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 131 षटके खेळल्यानंतर कसोटी ड्रॉ झाली. या सामन्यात आणखीही काही मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.
चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतने 72 वर्षांचा विक्रम मोडला
सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी 43.3 षटकांत 148 धावांची भागीदारी केली. यासह चौथ्या डावात सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम या दोघांनी आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियामधील चौथ्या डावातील ही दुसर्या क्रमांकाची भागीदारीदेखील आहे. यापूर्वी 1949 मध्ये विजय हजारे आणि रशियन मोदी यांनी चौथ्या डावात अखेरच्या दिवशी 139 धावांची भागीदारी केली होती.
ऑस्ट्रेलियात चौथ्या डावात सर्वाधिक षटके खेळणारा भारत आशियाई संघ ठरला
भारतीय संघाने चौथ्या डावात 131 षटकांची फलंदाजी करताना सिडनी कसोटी ड्रॉ केली. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात सर्वाधिक षटके खेळणारा भारत आशियाई देश बनला आहे. यासह चौथ्या डावात सामना ड्रा करण्यासाठी सर्वाधिक षटके खेळणारा भारत चौथा संघ ठरला आहे. 1979 मध्ये भारताने सर्वाधिक 150.5 षटके खेळली होती.
विहारी आणि अश्विन यांच्या नावेही मोठा विक्रम
भारतासाठी कसोटी ड्रॉ होण्यात हनुमा विहारी आणि आर. अश्विन या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 259 चेंडूत 62 धावांची नाबाद भागीदारी केली. यासह भारतासाठी सहाव्या विकेटसाठी सर्वाधिक षटके खेळण्याचा विक्रम या दोघांच्या नावे झाला आहे. कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात 1992 नंतर प्रथमच असे घडले आहे, जेव्हा भारताच्या चार फलंदाजांनी 100 किंवा त्यापेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला होता.